Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणाला नवे वळण, पती नीलेशनंतर डॉ. स्वाती चव्हाणांना अटक

नाशिक : राज्याला हादरवणाऱ्या प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा नीलेश जेजुरकर मृत्यू प्रकरणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच प्रकरणात पोलिसांनी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील (Civil Hospital) मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांना अटक केली आहे. या नव्या कारवाईमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात आणि शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

आतापर्यंत काय काय घडलं?

6 मार्च रोजी नाशिकच्या गंगापूर रोडवरील डी. के. नगर भागातील रेवती ब्लू अपार्टमेंटमध्ये 40 वर्षीय डॉ. मनीषा जेजुरकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉ. मनीषा यांच्या निधनानंतर त्यांची बहीण रोहिणी वैभव थोरात यांनी गंगापूर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार मनीषा यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीनंतर 2021 पासून डॉ. नीलेश हे त्यांच्या सहकारी महिला डॉक्टरच्या सल्ल्याने वागत होते आणि पत्नीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होते. डॉ. नीलेश यांचे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप कुटुंबाने केला. नुकतेच पोलिसांनी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागप्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी डॉ. नीलेश जेजुरकर यांची कसून चौकशी केली असता आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे या गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशयावरून हे कारवाई करण्यात आली. या दोन हायप्रोफाईल डॉक्टरांच्या अटकेमुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात आणि संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

जानेवारी महिन्यात संबंधित महिला डॉक्टरने मनीषा यांना फोन करून ‘तुझ्या बुद्धीची पातळी कमी आहे, तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाहीस, असे म्हणून हिणवले होते. तसेच, त्यांचा मानसिक छळ केला होता, असा आरोपही फिर्यादीत केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर नीलेश यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, 17 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. जामीन फेटाळल्यानंतर 18 सप्टेंबररोजी नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने डॉ. नीलेश यांना ताब्यात घेतले आणि अटक केली. न्यायालयाने त्यांना 22 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *