Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

कुणाला बसणार जबरी झटका? शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम सुनावणी, शिंदे सेनेचे 5 ठळक मुद्दे कोणते?

शिवसेना मालकी हक्कावरून आणि पक्षाचा सातबारा कुणाच्या नावावर होणार यावरून सर्वोच्च युक्तीवाद सुरू आहे. पक्ष आणि चिन्हावर उद्धव ठाकरे यांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.

शिंदे सेनेने गेल्या आठवड्यात पोटतिडकीने किल्ला लढवला. बहुमताचा गजर करत विधिमंडळ आणि राजकीय पक्षाची फोड त्यांनी खोडून काढण्याचा जबरी प्रयत्न केला. पण सर्वोच्च न्यायालयाच्या गुगलीमुळे पारडे नेमके कुणाच्या बाजूने फिरणार याची उत्सुकता ताणल्या गेली आहे. जनतेच्या न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत शिंदे सेना किल्ला लढवताना दिसत आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा सुनावणी होणार आहे.

आज दुपारी सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. सरन्यायधीश सुर्यकांत यांच्या पीठासमोर दुपारी २ वाजल्यानंतर सुनावणीला सुरुवात होईल. आजही शिंदेंच्या पक्षाचे वकील नीरज किशन कौल युक्तिवाद करणार आहेत. गेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती बागची यांच्याकडून अनेक प्रश्न कौल यांना विचारले गेले. पक्ष आणि चिन्ह देताना चौथ्या पर्यायाचा विचार का केला नाही? असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला होता. सोबतच, चिन्ह गोठवून दोन्ही पक्षांना नव चिन्ह देता आल असत का असा सवाल देखील बागची यांनी विचारलं होता. मात्र हे सर्व अधिकार निवडणूक आयोगाचे असून त्यांनी सर्व गोष्टी नियमानुसार केल्याचा युक्तिवाद शिंदेंच्या पक्षाकडून करण्यात आला होता. आज नीरज किशन कौल हे काही जुन्या केसेसचा दाखला देत युक्तिवाद करण्याची शक्यता आहे.

शिंदे सेनेने मांडलेले पाच ठळक मुद्दे

विधिमंडळ आणि पक्षातील बहुमत

शिवसेना फुटीनंतर बहुसंख्य आमदार आणि खासदार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वावर विश्वास दाखवला. लोकप्रतिनिधींनी राजकीय आणि विधिमंडळ दोन्ही ठिकाणी बहुसंख्येने शिंदे यांना पाठिंबा दिला. हेच खरे पक्षाचा आधार मानल्या जाते.

निवडणूक आयोगासाठी वकिली

गेल्या सुनावणीत शिंदे सेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाची वकिली केल्याचे दिसले. चिन्ह वाटप आदेश 1968 (Symbol Order 1968) नुसार, पक्षात फूट पडल्यास बहुमताच्या चाचणीच्या आधारे निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचा दावा केला. आयोगाने दोन्ही बाजूंचे पुरावे ग्राह्य धरतच निष्पक्ष निर्णय दिल्याचा युक्तीवाद शिंदे सेनेकडून करण्यात आला.

पक्षातंर्गत लोकशाहीला हरताळ

ठाकरेंकडून हुकूमशाही पद्धतीने कारभार करण्यात येत होता. पक्षातंर्गत लोकशाही नांदतच नव्हती. मूळ विचारसरणी आणि हिंदुत्वाच्या मुद्यापासून पक्ष भरकला. त्याविरोधात लोकप्रतिनिधी घटनात्मक बंडाळी केल्याचा दावा गेल्या सुनावणीत झाला.

10 अनुसूचीचा गैरवापर

ठाकरे गटाने दाखल केलेल्या अपात्रता याचिका राजकीय सूडबुद्धीने केलेल्या आहेत. पक्षांतर्गत मतभेद असणे म्हणजे पक्षांतर होत नाही, असा महत्त्वाचा युक्तीवाद करत शिवसेना पक्षातच सर्व लोकप्रतिनिधी असल्याचा आणि आपली सेना हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला.

राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष एकाच नाण्याची बाजू

राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा महत्त्वाचा युक्तीवाद शिंदे गटाने केला आहे. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष अशी वेगळी फोड करता येऊ शकत नाही अशी बाजू गेल्या सुनावणीवेळी मांडण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *