Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

BMC: मुंबई महापालिकेतील ८०० अभियंत्यांच्या बदल्या, नवे आदेश जारी होणार; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांची उचलबांगडी

मुंबई : पालिकेत वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व अभियंत्यांची आता उचलबांगडी होणार आहे. पालिकेच्या पारदर्शक ऑनलाइन बदली प्रक्रियेमुळे प्रशासनात मोठे फेरबदल होणार असून, येत्या महिन्याभरात जवळपास ८०० अभियंत्यांच्या बदल्या होणार आहेत.

या प्रक्रियेमुळे नवीन लोकांच्या नियुक्तीला होणारा विरोध मोडून काढला जाणार असून, मानवी हस्तक्षेपाशिवाय संगणकीय प्रणालीद्वारे या बदल्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पालिकेच्या नियमानुसार संबंधित खात्यात किंवा विभागात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचान्यांपैकी एकूण कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करण्याची तरतूद आहे, मात्र ७ ते १० वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून वसलेले अनेक अभियंते ही ऑनलाइन प्रक्रिया पुढे ढकलण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समोर आले आहे. नवीन अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगला विरोध होत असल्याने नवीन लोकांनी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन ऑनलाइन बदल्यांवर ठाम आहे.

अर्ज वाढण्याची शक्यता

वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ऑनलाइन प्रणालीच्या सॉफ्टवेअरमध्ये सर्व अभियंत्यांचा वैयक्तिक डेटा आणि रिक्त पदांची माहिती पूर्णपणे फीड करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय व वशिल्याशिवाय संगणकीय पद्धतीद्वारे या बदल्या पूर्ण केल्या जातील, पात्र अभियंत्यांना ५ ते २० सप्टेंबर २०२६ दरम्यान ऑनलाइन अर्ज करून आपल्या पसंतीचे ५ प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा दिली आहे.

शुक्रवारी (ता. १८) पर्यंत बदल्यांसाठी एकूण ४९४ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जाची मुदत २० सप्टेंबर असून, त्यानंतरच्या पुढील दोन दिवसांत आणखी १०० अर्ज येण्याची शक्यता आहे. या अर्जानंतर रिक्त पदे भरून एकूण ८०० च्या आसपास बदल्या होण्याचा अंदाज आहे. ऑनलाइन अर्जाची छाननी झाल्यानंतर १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *