आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! हिंजवडी मेट्रो स्थानकांना कंपन्यांची कार्यालये थेट जोडणार; पादचारी पुलांची तयारी

हिंजवडी-माण ते शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गावर पादचारी पूल तयार करून आयटी कंपन्यांची कार्यालये थेट स्थानकाला जोडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तसे आवाहन करण्यात आले होते आणि पाच कंपन्यांशी संपर्क झाला होता.
त्यापैकी एका कंपनीने प्रतिसाद दिला असून चार कंपन्यांकडून उत्तराची प्रतीक्षा आहे.
या मार्गाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. या सेवेचा सर्वाधिक फायदा आयटी अभियंते व कर्मचाऱ्यांना होणार आहे. प्रमुख आयटी कंपन्यांची कार्यालये मेट्रो स्थानकांशी जोडण्यासाठी स्वतंत्र पादचारी पूल (एफओबी) उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल) यांनी प्रमुख आयटी कंपन्यांशी संपर्क साधला आहे. तीन तंत्रज्ञान कंपन्या व अन्य दोन कंपन्यांना प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यापैकी एका कंपनीने तत्त्वतः मंजुरी दिली. ती दोन ठिकाणी पादचारी पूल उभारणार आहे. खांबांसाठी आवश्यक जमीन ‘एमआयडीसी’कडून उपलब्ध करून दिली जाणार असल्याने त्यास काहीसा कालावधी लागणार आहे.
रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
ट्रो सेवा (टप्पा १) :
माण डेपो ते शिवाजीनगर
२३ पैकी १७ स्थानके
कंपन्या (फेज १ ते ३) :
२३४
आयटी पार्कमधील स्थानके : माण डेपो ते हिंजवडी फेज १
८
एकूण कर्मचारी वर्ग :
चार लाख ५० हजार



