Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात मोठी खळबळ! गरब्यासाठी मुलींची भाडेतत्त्वावर बोली? नेमकं प्रकरण काय?

नवरात्री हा भारतातील सर्वात सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध उत्सव मानला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवी दुर्गाची उपासना केली जाते. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवरात्रीच्या काळात गरबा आणि डांडिया हे पारंपरिक नृत्य विशेष गाजतात.

रंगीबेरंगी कपडे, ढोल-ताशांचा गजर आणि गरबे हे या सणाचे वैशिष्ट्य आहे. गरब्यात पुरुष-स्त्रिया एकत्र येऊन वर्तुळात नृत्य करतात. हा उत्सव एकतेचा, भक्तीचा आणि आनंदाचा प्रतीक मानला जातो. मात्र अलीकडे याच पारंपरिक उत्सवात काही घाणेरडे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.

महाराष्ट्रात गरबा डान्स करण्यासाठी मुलींना भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रकार समोर आला आहे. काही ठिकाणी मुलींची १००० ते ५००० रुपयांच्या दरम्यान बोली लावून गरबा खेळण्यासाठी त्यांना बोलावले जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या प्रकाराला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शविला आहे.

संभाजी ब्रिगेडचा विरोध

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता ॲड. संतोष शिंदे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रात भाडेतत्त्वावर गरब्यासाठी मुली देण्याचा हा गोरखधंदा संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही. गरबा डान्स करण्यासाठी जर मुला-मुलींची १००० ते ५००० रुपये पर्यंत भाड्याने बोली लागत असेल, तर संभाजी ब्रिगेड असे कार्यक्रम उधळून लावल्याशिवाय शांत बसणार नाही. पुरोगामी महाराष्ट्रात असले हे घाणेरडे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.”

शिंदे यांनी पुढे सांगितले की, राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे आणि उत्सवाचे दिवस सुरू आहेत. अशा वेळी पारंपरिक उत्सव चुकीच्या धन दांडगे लोकांमुळे बदनाम होऊ नये, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवांना व्यावसायिक स्वार्थासाठी विकृत करण्याचे प्रकार थांबवले पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *