Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

देशाचे परराष्ट्रमंत्री, माजी उपराष्ट्रपती अन्… SIR ची नोटीस आलेल्या VIP व्यक्तींची यादी पाहून व्हाल थक्क; मतदार यादीतून यांची नावं कापणार?

दिल्लीमध्ये एसआयआर म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात मतदार यादीच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या पहिल्या फेरीनंतर तब्बल 33 लाख मतदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. विशेष म्हणजे एसआयआरसंदर्भात नोटीस पाठवण्यात आलेल्या मतदारांच्या यादीमध्ये अनेक दिग्गजांची नावं आहेत.

अगदी देशाच्या विद्यमान परराष्ट्र मंत्र्यांपासून ते निवडणूक आयुक्तांपर्यंत अनेकांचा नोटीस पाठवण्यात आलेल्या महत्त्वाच्या लोकांमध्ये समावेश आहे. या यादीतील महत्त्वाच्या लोकांची नावं पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

कोणाकोणाला आलीये नोटीस?

मतदार यादी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी केल्या जात असलेल्या या एसआयआर प्रक्रियेदरम्यान माहितीतील त्रुटीमुळे मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एसआयआर नोटीस पाठवण्यात आलेल्या अति महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा समावेश आहे. याशिवाय माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, भाजप नेते बी. एल. संतोष, निवडणूक आयुक्त एस. एस. संधू यांनाही माहितीमधील त्रुटीचं कारण दाखवत निवडणूक आयोगाकडून एसआयआरसंदर्भातील नोटीस पाठवण्यात आली आहे. याचबरोबर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री देखील नोटीस पाठवण्यात आली आहे. इतकेच काय तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि माजी मुख्यमंत्री तसेच ‘आम आदमी पार्टी’चे संस्थापक अरविंद केजरीवाल यांना देखील नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नेमकी कोणाला कशासाठी नोटीस आली आहे ते पाहूयात…

नोटीस आलेल्या VIP व्यक्तींची यादी

रेखा गुप्ता (दिल्लीच्या मुख्यमंत्री) – वयाच्या नोंदीतील तफावत असल्याने नोटीस.

अरविंद केजरीवाल (माजी मुख्यमंत्री) आणि कुटुंब (पत्नी सुनीता, मुलगा पुलकित, आई-वडील) – 2002 च्या यादीशी मॅप न झाल्यामुळे नोटीस पाठवण्यात आली.

लालकृष्ण अडवाणी आणि मुलगी प्रतिभा, सून गीतिका यांनाही एसआयआरची नोटीस पाठवण्यात आली आहे.

मनीष सिसोदिया (माजी उपमुख्यमंत्री)

कपिल सिब्बल (ज्येष्ठ वकील)

अभिषेक मनु सिंघवी (ज्येष्ठ वकील)

एस. जयशंकर (परराष्ट्र मंत्री) आणि पत्नी

जगदीप धनखड (माजी उपराष्ट्रपती) आणि पत्नी

कैलाश गहलोत

वीरेंद्र सचदेवा

बंसुरी स्वराज

पर्वेश साहिब सिंह

नोटीस आलेले इतर उच्च अधिकारी

उच्च अधिकारी आणि इतर

निवडणूक आयुक्त एस.एस. संधू

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री

सीबीआय संचालक प्रवीण सूद आणि कुटुंब

माजी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि पत्नी

सेबी अध्यक्ष तुहिन कांता पांडे

माजी दिल्ली एलजी नजीब जंग

नोटीस आलेल्यांनी काय करायचं?

नोटीस आलेल्या सर्वांना मतदारयादीमधील नाव कायम ठेवण्यासाठी 29 ऑक्टोबरपर्यंत नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित होणार आहे. नोटीस म्हणजे नाव यादीतून काढले जाणार असं म्हणता येणार नाही. नोटीसच्या माध्यमातून केवळ माहितीच्या तपशीलाची पडताळणी केली जाते. ही नोटीस सामान्य प्रक्रिया आहे. प्रभावित व्यक्तींनी कागदपत्रे सादर करून पडताळणी करणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *