Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग गेली तब्बल 10 किलोमीटर पेक्षा जास्त लांब

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी उसळली आहे. दरवर्षी देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात. आज रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने लालबाग राजाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. लालबाग-परळचा परिसर भक्तांनी फुलून गेला आहे. लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग तब्बल 10 किलोमीटर पेक्षा जास्त लांब गेली आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे गणेशभक्तांनी लालबागचा राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी केली आहे. लालबाग मार्केट ते भायखळा रेल्वे स्टेशन पर्यंत ही दर्शन रांग पोहचली आहे. रविवारी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची सर्वाधिक गर्दी होणार आहे. शनिवारपासूनच लालबाग, परळ, काळाचौकी परिसरात मोठी गर्दी आहे. काल काळाचौकी येथे महागणपतीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांसोबत मोठी एक दुर्घटना घडली. लालबागमध्ये आज गर्दीचं नियोजन करताना पोलीस यंत्रणेचा कस लागणार आहे.

मुंबईच्या राजाला 101 अमेरिकन डॉलरचा हार

गणेश गल्ली येथील मुंबईच्या राजाच्या पुजेच्या मूर्तीला भाविकाकडून 101 अमेरिकन डॉलरचा हार घालण्यात आला. मुंबईतील गणेशोत्सवात यंदा डॉलरच्या हारांची क्रेज आहे. याअगोदर देखील लालबागच्या राजाला एका भक्ताने डॉलरचा हार अर्पण केला होता. यंदा गणेशोत्सवात भारतीय चलन तसंच विदेशी चलन भाविकांकडून दान केले जात आहे.

लालबाग-परेल हा भाग गणेशभक्तांनी फुलून गेला

मुंबईत सर्वत्र गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पहायला मिळतोय. आज गणेशोत्सवाचा सातवा दिवस आहे. काल गौरी-गणपतीचं विसर्जन पार पडलं. आज रविवार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी घराबाहेर पडतील. कालपासून मुंबापुरीत मोठी गर्दी उसळली आहे. लालबाग-परेल हा भाग गणेशभक्तांनी फुलून गेला आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *