Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

संभाजीनगर हादरलं! उपचारासाठी घाटीत आलेल्या 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, जुन्या क्वार्टर्समध्ये नेत तोडले अब्रूचे लचके

छत्रपती संभाजीनगर: शहरात एका २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. घाटी रुग्णालयासमोरील जुन्या क्वार्टर्सच्या परिसरात हा प्रकार घडला असून, घटनेचे गांभीर्य ओळखून बेगमपुरा पोलिसांनी अत्यंत जलद कारवाई करत अवघ्या तीन तासांच्या आत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पहाटेच्या सुमारास घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना १९ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडली. पीडित २० वर्षीय तरुणीला आरोपींनी मारहाण करत आणि जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. या भयानक प्रकारानंतर पीडितेने हिंमत दाखवत बेगमपुरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

मुंबईला पळण्याचा कट; पोलिसांची कारवाई

गुन्हा दाखल होताच बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दोन्ही आरोपी मुंबईच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने वेगवेगळ्या टीम तयार करून जाळे विणले आणि अवघ्या ३ तासांत दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

रोहन जगदीश रिडलान आणि विशाल प्रकाश चावरिया असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. रोहनला पोलिसांनी जालना परिसरातून ताब्यात घेतलं. तर विशालला संभाजीनगर शहरातील जुब्ली पार्क परिसरातून बेड्या ठोकल्या. तो मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत होता.

मारहाण आणि धमकी देऊन अत्याचार करणाऱ्या या दोन्ही आरोपींवर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असून या प्रकरणाचा पुढील सखोल तपास बेगमपुरा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *