Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

Asian Games मध्ये भारताच्या लेकींनी मिळवून दिलं पहिलं पदक! शूटिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय संघाने पदक पटकावण्याचा श्रीगणेशा केला आहे. आज २० सप्टेंबर २०२६ पासून स्पर्धेला अधिकृतपणे सुरूवात झाली आहे.

स्पर्धेच्या सुरूवातीलाच भारताच्या महिला नेमबाजी संघाने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.

सोनम मस्कर, एलावेनिल वलारिवन आणि विदर्सा विनोद के यांच्या त्रिकुटाने रविवारी महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिलं. चीनने १९०४.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावलं, तर भारताने ०.९ गुणांच्या फरकाने दुसरं स्थान कायम राखलं. जपानने १८९७.१ गुणांसह कांस्यपदक जिंकलं. कोरियाचं आव्हान अखेरच्या क्षणापर्यंत कायम होतं; मात्र चो उनब्योलने शेवटच्या मालिकेत खराब कामगिरी केल्याने भारताचा रौप्यपदकाचा मार्ग मोकळा झाला.

भारताकडून सोनम मस्करने सर्वाधिक गुणांची कमाई केली. तिने वैयक्तिक पात्रता फेरीत ६३४.१ गुणांसह चौथं स्थान मिळवलं. ऑलिम्पियन एलावेनिल वलारिवनने ६३३.५ गुणांसह सातवं स्थान पटकावलं. या दोन्ही भारतीय नेमबाजांनी दिवसभरात होणाऱ्या आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला आहे.

दरम्यान, महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत चीनने १९०४.२ गुणांसह नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. वांग झीफेई, हान जियायु आणि डू डू येचेन या चीनच्या तिकडीने गेल्या वर्षीच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत लिऊ याफेई, पेंग शिनलू आणि झांग लियुआन यांनी मिळून नोंदवलेल्या १९०२.० गुणांच्या आधीच्या विश्वविक्रमाला मागे टाकलं.

भारतीय नेमबाजांनी हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत विक्रमी २२ पदकं (सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि सहा कांस्य) जिंकली होती आणि आता, हे रौप्य पदक भारताच्या नेमबाजी मोहिमेची एक उत्साहवर्धक सुरुवात ठरलं आहे. यानंतर भारताचे नेमबाज यंदा किती पदकांची कमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *