Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

राज्यातील ‘या’ तीन मार्केटमध्ये कापूस खरेदीला प्रारंभ, पहा सरासरी भाव काय मिळाला?

खेतिया येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदीच्या शुभमुहूर्तावर चांगल्या प्रतीला ९ हजार ९ रुपये क्विंटल भाव मिळाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी लवकर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

शुभारंभप्रसंगी जास्तीत जास्त भाव ९ हजार ९ रुपये तर कमीत कमी ७ हजार ६४० रुपये तर सरासरी भाव ०८ हजार रुपये एवढा होता.

बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या कापसाला सर्वात जास्त भाव सर्वप्रथम पहिले वाहन व पहिली बोली लोहगाव ता. शिंदखेडा, जि. धुळे येथील शेतकरी दत्तात्रय जगन्नाथ पाटील यांच्या कापसाला ९ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला. यावेळी बाजार समितीमध्ये एकूण ७० वाहने कापूस विक्रीसाठी आले होते. मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेवर असलेल्या या मध्यवर्ती बाजारपेठेकडे लक्ष लागून असते.

कजगाव मार्केट यार्ड (भडगाव तालुका) यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीचा शुभारंभ भडगाव तालुक्यातील कजगाव येथे गौरीपूजनाच्या मुहूर्तावर झाला. पहिल्या वेचणीचा कापूस विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीच्या मालासाठी ८१८१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. यामुळे कापूस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मे महिन्यात लागवड केलेल्या बागायती कपाशीची वेचणी सुरू झाली असून, काही शेतकऱ्यांनी पहिली वेचणी करून कापूस विक्रीसाठी आणला. कजगाव, मळगाव, तांदुळवाडी व सार्वे येथील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाजारपेठेत आणला होता. चांगल्या प्रतीच्या कापसाला ८१८१ रुपये भाव देण्यात आला.

धुळे जिल्ह्यातील मालपूर मार्केट यार्ड शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर कापसाची खरेदी सुरू झाली आणि यंदा कापसाला नऊ हजार एक रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर करण्यात आला. गावकऱ्यांच्या समन्वयातून शेतकऱ्यांना हा दर देण्यात आला आहे. हा दरावर आजही खरेदी सुरु आहे. येथील प्रमुख कापूस खरेदीदार गिरधन माळी यांनी यंदा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर खरेदीची सुरुवात केली. दरवर्षी नवरात्रोत्सवाची प्रतीक्षा असायची मात्र यंदा पांढऱ्या सोन्याचा हंगाम लवकर सुरू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *