Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

गुप्त माहिती फुटली, गुटख्याच्या ट्रकने मार्गच बदलला, एफडीएने 6 तास पाठलाग करून पकडले; फिल्मी स्टाईल थरारक कारवाईत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुटखा तस्करांचे पंबरडेच मोडण्याचा विडा उचलला आहे. परंतु कारवायांपूर्वीच गुप्त माहिती फुटू लागली आहे. मध्य प्रदेशातून मोठय़ा प्रमाणात गुटखा घेऊन ठाण्याला येणाऱ्या ट्रकने अचानक मार्ग बदलला.

तरीही एफडीए अधिकाऱयांनी सहा तास त्या ट्रकचा थरारक पाठलाग करून तो पकडला आणि कोटय़वधींचा गुटखा जप्त केला.

टाटा कंपनीच्या एमएच18-बीझेड- 2350 या ट्रकमधून गुटख्याची वाहतूक होत आहे आणि तो ट्रक मध्य प्रदेशातून भिवंडीमार्गे ठाणे येथे येत आहे, अशी गुप्त माहिती एफडीएला मिळाली होती. 18 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता तो ट्रक पकडण्यासाठी एफडीएने नियोजित मार्गावर सापळा लावला. परंतु अचानकपणे ट्रक चालकाने मार्ग बदलून संगमनेरमार्गे तो पुण्याच्या दिशेने वळवला.

गाडी आडवी घालूनही ट्रक चालकाचे पलायन

एफडीए अधिकाऱयांना ट्रकने मार्ग बदलल्याचे कळल्यानंतर त्यांनी तातडीने सूत्रे हलवली. एफडीएची पथके सक्रीय केली. ठाणे विभागाचे पथक मुरबाडच्या दिशेने तर पुणे विभागाचे पथक राजगुरूनगर येथे तैनात करण्यात आले. राजगुरूनगर टोलनाक्यावर अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत साळवे यांनी गाडी आडवी लावून ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक चालकाने ट्रक न थांबवता सुसाट पुढे नेला. एफडीएच्या पथकांनी त्याचा पाठलाग सुरू केला.

रजनीगंधा, आरएमडीसह विविध गुटख्यांची तस्करी

सहा तासांच्या थरारक पाठलागानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने चाकण-तळेगाव चौक येथे रात्री 8 वाजता तो ट्रक पकडला गेला. तपासणी केली असता ट्रकमध्ये विविध पंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आढळला. त्यात रजनीगंधा, तुळशी रॉयल, तानसेन, टी. ओ. प्रीमियम, आरएमडी पानमसाला यांचा समावेश आहे. ट्रकसह हा गुटखा जप्त करण्यात आला. त्याची किंमत 1 कोटी 13 लाख 54 हजार 600 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *