ताज्या बातम्या
मोठी बातमी! MPSC मुख्य परीक्षा 2025 प्रकरणात मोठी अपडेट, मुख्यमंत्र्यांकडून मोठं आश्वासन, विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य

राज्यसेवा मुख्य परिक्षा 2025 प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. विद्यार्थ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पेपर पुनर्तपासणी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्यासोबतची चर्चा यशस्वी झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व समस्यांचे निरसन झाले आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने दिली आहे. पेपरची पुनर्तपासणी करण्याचे आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे.



