भारतातील सर्वात रहस्यमय किल्ला ज्याच्या भिंतींमधून होतो रक्तस्त्राव, रात्री कानावर पडतात भयानक किंकाळ्या…

भारतात अनेक प्राचीन किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. हे किल्ले गतकाळातील इतिहासाची कथा व्यक्त करतात. देशात अनेक वास्तू या तिथल्या साैंदर्यामुळे किंवा त्या जागेच्या भव्यतेमुळेच नाही तर तेथील काही भयानक कथांमुळेही चर्चित आहेत. आज आम्ही तुम्हाला देशातील अशाच एका प्राचीन आणि रहस्यमय किल्ल्याची माहिती सांगत आहोत ज्याची कथा आजही लोकांचा थरकाप उडवते. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
बिहारमध्ये आहे रहस्यमय किल्ला
आम्ही सांगत असलेला हा किल्ला बिहारच्यारोहतास जिल्ह्यात वसलेला आहे. याचे नाव आहे रोहतासगढ़, हा किल्ला देशातील ऐतिहासिक आणि प्राचीन ठिकाणांपैकी एक आहे. किल्ल्याची भव्यताच नाही तर याच्या गूढ कथा देखील लोकांना नेहमीच थक्क करतात. सांगितलं जातं की, एकेकाळी या किल्ल्याच्या भिंतींमधून रक्तस्त्राव होत होता. इतकंच नाही तर रात्रीच्या वेळी किल्ल्यातून भयानक आवाज आणि किंकाळ्या देखील ऐकायला येत असे.
त्रेता युगाशी जोडलेला आहे इतिहास
रोहतासगढ़ किल्ल्याचा इतिहास फार जुना असून तो मनोरंजक देखील आहे. काही दाव्यांनुसार, किल्ल्याची निर्मिती त्रेता युगावेळी केली असून ती अयोध्येचे सूर्यवंशी राजा त्रिशंकू यांचा नातू आणि राजा हरिश्चंद्र यांचा मुलगा रोहिताश्वने केली. त्याच्या नावावरुन या किल्ल्याला रोहतासगढ़ असे नाव पडले. पर्वतांमध्ये उंच ठिकाणी बांधलेला हा भव्य किल्ला त्याच्या मजबुती आणि भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. आजही अनेक पर्यटक हा प्राचीन किल्ला पाहण्यासाठी रोहतासला भेट देतात. इथे तुम्हाला किल्ल्याचा आतमध्ये अनेक प्राचीन दरवाजे, मंदिरे, राजवाडे आणि ऐतिहासिक वास्तू पाहता येतील. यासोबतच कैमूर टेकड्यांंमधून निघून पुढे सोन नदीला मिळणारे धबधबे देखील फार लोकप्रिय आहेत.
भिंतींमधून रक्त टिपकण्याची कथा
रोहतागढ किल्ल्यासंबंधित एक रहस्यमय कथा खूप चर्चित आहे. स्थानिकांचे मते, अनेक वर्षांपूर्वी किल्ल्यांच्या दगडी भिंतीमधून लाल रंगाचे द्रव पाझरत होते, ज्याला रक्त मानले जात होते. साधारण २०० वर्षांपूर्वी फ्रांस इतिहासकार बुकानन याने आपल्या भारत दाैऱ्यादरम्यान या घटनेची नोंद आपल्या दस्तऐवजामध्ये केली होती. त्यांनी यात लिहिले होते की किल्ल्यांच्या भिंतीमधून लाल रंगाचा पदार्थ निघताना त्यांना दिसला.
स्थानिकांचा असाही दावा आहे की, रात्रीच्या वेळी या किल्ल्यामधून रडण्याचे आणि किंकाळीचे आवाज कानावर पडतात. हेच कारण आहे की संध्याकाळनंतर कुणीही या किल्ल्याच्या परिसरात जात नाही. लोक आजही रात्री या परिसरात जायला घाबरतात. तथापि, या गोष्टींची वैज्ञानिक पुष्टी करण्यात आलेली नाही. ही कथा आणि रडण्याचे ते आवाज आजही लोकांसाठी एक रहस्यमय गूढ बनून राहिले आहे.



