Navgan News



Add Space

आंतरराष्ट्रीयनवगण विश्लेषणराष्ट्रीय

महायुद्धाची ठिणगी? अमेरिका इराणवर आणखी हल्ले करण्याच्या तयारीत; ट्रम्प यांनी दौरा केला रद्द!

महायुद्धाची ठिणगी? अमेरिका इराणवर आणखी हल्ले करण्याच्या तयारीत; ट्रम्प यांनी दौरा केला रद्द!

इराणसोबत सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या व अंतिम टप्प्यातील शांतता चर्चेत योग्य तोडगा निघाला नाही तर पुन्हा नव्याने अत्यंत भीषण हल्ले करण्याची तयारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केली आहे.

ट्रम्प यांनी इराणबाबत कठोर निर्णय घेतल्यास पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

राजनैतिक पातळीवरील प्रयत्नांना मिळणाऱ्या संथ प्रतिसादामुळे ट्रम्प प्रशासन कमालीचे अस्वस्थ झाले आहे. या प्रदीर्घ संघर्षावर कायमचा पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा विजय घोषित करण्यासाठी ट्रम्प थेट लष्करी कारवाईचा पर्याय निवडण्याची दाट शक्यता असल्याचा दावा ‘अॅक्सिओस’ व ‘सीबीएस’ या आघाडीच्या वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात केला आहे.

ट्रम्प यांचा दौरा रद्द

नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये राजकीय सभेसाठी गेले होते. त्यानंतर न्यू जर्सीतील बेडमिन्स्टर गोल्फ क्लबमध्ये ते या आठवड्याच्या शेवटी थांबणार होते. मात्र, त्यांनी हा दौरा अचानक रद्द करून शुक्रवारी रात्री पुन्हा व्हाइट हाउसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी शुक्रवारी वरिष्ठ राष्ट्रीय सुरक्षा पथकाची बैठक घेतली. व्हाइट हाउसमध्ये झालेल्या या बैठकीला उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स, संरक्षणमंत्री पीट हेगसेथ, केंद्रीय गुप्तचर संस्थेचे संचालक जॉन रॅटक्लिफ व व्हाइट हाउसच्या प्रमुख अधिकारी सूझी वाइल्स यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *