युद्धबंदीसाठी इराणचा ग्रीन सिग्नल! २४ तासांत अमेरिकेला पाठवणार अंतिम प्रस्ताव, महायुद्धाचा धोका टळणार?

इराणला युद्धबंची स्वीकार्ह
पण अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
येत्या २४ तासात पाकिस्तानमार्फत पाठवणार प्रस्ताव
महायुद्धाचा धोका टळणार?
Iran US Peace Deal News : वॉशिंग्टन/तेहरान : पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
अमेरिका (America)इराणमधील संबंधाचा एक नवा अध्याय आता सुरु होणार आहे. इराणने युद्धबंदीसाठी तयारी दर्शवली असून अमेरिकेच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. पुढील २४ तासांत पाकिस्तानमार्फत अमेरिकेला अंतिम प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
इराण युद्धबंदीसाठी तयार, पण…
अनेक दशकांपासून एकमेकांचे कट्टर वैरी असलेले अमेरिका इराण (Iran) शांततेसाठी वाटाघाटीच्या टेबलावर आले असून या प्रक्रियेत पाकिस्तान (Pakistan) मध्यस्थीची भूमिका बजावत आहे. मिळालेल्यचा माहितीनुसार, अमेरिकेच्या प्रस्तावाचा आढावा इराणने पूर्ण केला आहे.
हा प्रस्ताव इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या सल्लागार आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) मध्ये सखोल चर्चेनंतर मान्य करण्यात आला आहे. इराणला या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे, परंतु काही विशिष्ट सुधारणा आणि अटींमध्ये बदल केला आहे.
जागतिक समर्थन
अमेरिका इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानच नव्हे, तर रशिया (Russia), चीन आणि सौदी अरेबियासारख्या मोठ्या देशांनीही पाठिंबा दिला आहे. नुकतेच इराणच्या परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली असून अमेरिकेशी सकारात्मकतेने चर्चा सुरु ठेवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
येते ६ दिवस अत्यंत निर्णयाक
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सध्या सावध पवित्रा घेतला आहे. येत्या ४ ते ६ दिवसांत जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने इराणने मांडलेल्या प्रस्तावित सुधारित अटी मान्य केल्यास दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चेला सुरुवात होऊन दशकांपासूनचा संघर्ष संपुष्यात येऊ शकतो.
ट्रम्प यांचा इराणला इशारा
दरम्यान ट्रम्प यांनी इराणला शेवटचा इशारा दिला आहे. त्यांनी ०७ मे रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले होते की, इराणने शांतता कराराच्या अटी मान्य केल्या नाहीत तर त्यांच्यावर पुन्हा हल्ले केले जातील. एवढेच नाही तर हे हल्ले पूर्वीपेक्षा अधिकत तीव्र आणि व्यापक असतील, ज्याचा गंभीर परिणाम होईल, असेही ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले आहे. यासाठी इराणला ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे.
ऑपरेशन एपिक फ्युरी पूर्ण
दुसरीकडे अमेरिकेन इराणविरोधी सुरु केलील ऑपरेशन एपिक फ्युरी ही लष्करी मोहिम पूर्णपणे थांबवली आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच प्रोजेक्ट फ्रीडमलाही स्थगिती देण्यात आली आहे.



