महाराष्ट्रात आषाढी वारी आणि कार्तिकी वारीला वारकरी पायी विठ्ठलाचे दर्शन घ्यायला जातात. परंपरेनुसार ही वारी घडते, यातला रिंगण सोहळा होतो आणि एकादशीला पंढरपूरला वारकऱ्यांची मांदियाळी जमते.
वेगवेगळ्या भक्तांकडून विटेवरी उभ्या विठ्ठलाच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. विठ्ठलाच्या कानाजवळ मासा असतो असेही तुम्ही ऐकले असेल, तर जाणून घेऊया यासंबंधी कथा आणि मान्यता.
विठ्ठल देवाचे वर्णन –
श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे.
वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे. माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो.
याचं खरं उत्तर असं की, विठोबाच्या कानात मासे नाहीत तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत. महाभारतात कर्णाला जन्मत: सुवर्णकुंडले आणि सुरर्ण कवच होते. तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे.
माऊलींच्या कानातील आकर्षक कुंडले ठरले मासे –
यामागची कथा अशी आहे की, एकदा एक कोळी पांडूरंगाना भेटायला उपहार द्ययला त्यांच्याकडे जातो. पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत, का कारण की तो एक मच्छिमार आहे न. आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण दोन. बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोय, पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना.
तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की.. “तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय. त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा. आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्विकार करेल, मग ते काही ही असू द्या. कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत.
आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेद्भाव्नेत अडकत नाही.” असं सांगून ते त्या व्यक्ती कडून ते दोन मासे घेतात आणि सर्वाना समजल पाहिजे की सगळे समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात.