जनरल नॉलेज

Diamond | शास्त्रज्ञाना बुध ग्रहावर सापडले चक्क हिरे..


Diamond Layer On Mercury | आपल्या अवकाशामध्ये अनेक ग्रह तारे असतात. आणि या ग्रह ताऱ्यांबद्दल सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते. आपले शास्त्रज्ञ देखील गेले कित्येक वर्षापासून सगळ्या ग्रहांवरील गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशातच आता बुध ग्रहावर शास्त्रज्ञांना मोठी गोष्ट सापडलेली आहे. शास्त्रज्ञांना बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर हिरे (Diamond Layer On Mercury)सापडलेले आहे. परंतु हे हिरे पृथ्वीवर आणता येणार नाहीत. याबद्दल देखील त्यांनी अनेक गोष्टींचा शोध घेतलेला आहे.

बुध ग्रहामध्ये रहस्य | Diamond Layer On Mercury

बुधा एक असा ग्रह आहे. जिथे अनेक रहस्य दडलेली आहेत. या ग्रहावर सर्वत्र चुंबकीय क्षेत्र आहे. यामुळे ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र हे पृथ्वीच्या तुलनेत खूपच कमकुवत आहे. कारण हा ग्रह खूपच लहान आहे आणि भौगोलिकदृष्ट्या जास्त सक्रिय नाही.

नासाच्या मेसेंजर मिशनने बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर गडद रंग ग्रेफाईट म्हणून ओळखले होते. हे एक कार्बनचे रूप आहे. त्याचप्रमाणे बुध ग्रहाचे रहस्य त्याच्या आतील स्तराची संरचनेचा अभ्यास करूनच उघड होऊ शकते. अशी देखील माहिती मिळालेली आहे. याच प्रमाणे यान्हाओ ली, यांनी सांगितलेले आहे की, “आम्हाला शंका आहे की हा ग्रह इतर ग्रहांप्रमाणे तयार झालेला आहे. म्हणजेच गरम मॅग्मा उतरल्यानंतर पण बुध ग्रहातील मॅग्मा समुद्र कार्बन आणि सिलिकेटचे समृद्ध असावा. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे हिरे सापडले आहेत हा एक पूर्णपणे घन हिरा आहे.”

याआधी म्हणजे 2019 मध्ये देखील एक अभ्यासावर आला होता. ज्यावेळी बुध ग्रहाचे निरीक्षण करण्यात आले होते. त्यावेळी बुध ग्रहाचे आवरण हे पूर्वी लावलेल्या अंदाजापेक्षा पाच किलोमीटर खोल आहे. म्हणजेच गाभा आणि आवरण यांच्यामध्ये खूप दबाव निर्माण होऊन, त्यामुळे ग्रहाच्या आज असलेल्या कार्बन हिऱ्यांमध्ये बदलत असावा. त्यामुळेच हिऱ्याचा इतका जाड थर सापडलेला आहे असे अंदाज लावले जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *