देश-विदेश

1 किलोचे मिळणार 3 कोटी रुपये, भारताच्या या गावात मिळालं ‘हिरवं’ सोनं !


छत्तीसगड: अणुऊर्जा निर्मिती, अण्वस्त्रांमध्ये वापरला जाणारा युरेनियम हा महत्त्वाचा घटक आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये युरेनियमचा साठा आहे. त्यात भारताचादेखील समावेश आहे. छत्तीसगडमधून या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

तिथल्या कोरबा परिसरात युरेनियमचा साठा असण्याची शक्यता असून, त्याचा शोध घेतला जात आहे. याबाबत खनिज संपुत्ती विभागाने एक आदेशदेखील जारी केला आहे.

वीज आणि कोळशाचा पुरवठा करणाऱ्या कोरबामध्ये आता युरेनियमचा शोध घेतला जाणार आहे. कोरबात यापूर्वी लिथियमचे साठे सापडले होते. यानंतर इथे युरेनियमचा साठा शोधला जाणार आहे. छत्तीसगड सरकारच्या खनिज संपत्ती विभागाने याबाबत एक आदेश जारी केला आहे. कोरबातल्या कोसगाईजवळच्या धनगाव-गडतरा गावात युरेनियम सर्वेक्षण केलं जाणार आहे.

युरेनियमचा वापर सैन्याकडून आण्विक पाणबुडी आणि अण्वस्त्रं तयार करण्यासाठी केला जातो. अणुऊर्जा निर्मितीसाठीदेखील याचा वापर होतो. भारतासह जगभरातले विकसनशील देश सध्या कोळशावर आधारित विजेवर अवलंबून आहेत. विकसित देश आता अणुआधारित वीज उत्पादनाकडे वाटचाल करत आहेत. यासाठी युरेनियमचा वापर होतो. युरेनियम हे पृथ्वीवर आढळणारं सर्वांत दुर्मीळ खनिज असून एक किलो युरेनियमची किंमत अंदाजे तीन कोटी रुपये आहे.

कोरबा परिसरात अणु खनिज उत्खनन आणि संशोधन संचालनालय येत्या पाच वर्षांत संशोधन करणार आहे. या गावातलं काही क्षेत्र राखीव करण्यात आलं आहे. या ठिकाणी युरेनियम साठ्याचा शोध सुरू केला जाईल. धनगाव गडतरा हे गाव पाच वर्षांच्या कालावधीसाठी अणु खनिज उत्खनन आणि संशोधन संचालनालयाकडे सोपवण्यात आलं आहे. त्या ठिकाणी हे संशोधन होईल.

छत्तीसगडच्या खनिज संपत्ती विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, या गावातलं पाच चौरस किलोमीटर क्षेत्र आरक्षित करण्यात आलं आहे. तिथे आण्विक खनिज सवलत नियम 2016 अंतर्गत युरेनियम, लिथियम आणि संबंधित खनिजांच्या सर्वेक्षणाचं काम केलं जाईल.

खनिज संपत्ती विभागाचे विशेष सचिव सुनील कुमार जैन यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, धनगाव गडतरा गावातलं पाच चौरस किलोमीटर क्षेत्र आरक्षित करण्यात आलं असून, त्यावर केंद्र सरकारच्या अणु खनिज उत्खनन आणि संशोधन संचालनालयाला एक्सप्लोरेशन एजन्सी म्हणून अधिसूचित केलं आहे. ही एजन्सी गावात युरेनियमचा साठा शोधेल.

नुकताच कोरबा जिल्ह्यातल्या कटघोरा इथल्या लिथियम साठ्याचा लिलाव करण्यात आला. घुचापूर हे गाव आणि परिसरातलं 250 हेक्टर क्षेत्र लिथियम ब्लॉक म्हणून ओळखलं जातं. लिथियम असल्याची खात्री झाल्यावर केंद्रीय खाण मंत्रालयाने त्याचा लिलाव केला. जी मॅकी साउथ मायनिंग प्रायव्हेट लिमिटेडने सर्वाधिक बोली लावून ब्लॉक विकत घेतला. तिथे लवकरच लिथियमचं उत्पादन सुरू होईल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *