Video पंतप्रधान मोदींनी सांगितलं 2047 चे व्हिजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलाखतीत काय म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मुलाखत नुकतीच प्रसारीत करण्यात आली. न्यूज एजन्सी एएनआयने ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या व्हिजनच्या संदर्भात भाष्य केलं आहे.
व्हिजन 2047 कसे चालेल याबाबत त्यांनी मुलाखतीत सांगितले आहे. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जेव्हा मी बोलतो की माझे मोठमोठे प्लान आहेत आणि मोठमोठे निर्णय आहेत. तर त्याचा अर्थ असा नाही की, मी कोणालाही खाबरवण्यासाठी किंवा दाबण्यासाठी नाही तर माझे निर्णय हे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहेत. मी कधीही वेळ वाया घालवू इच्छित नाही.
अनेक सरकारला वाटते की, त्यांनी खूप काही केले आहे. पण माझा यावर विश्वास नाहीये. मी शक्य ते करण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरी सुद्धा मला वाटते की, आणखी खूप काही करण्याची गरज आहे. योग्य दिशेने जाण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अजूनही खूप काही मला करायचं बाकी आहे. प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न पूर्ण कसं होईल हे माझ्या मनात आहे. त्यामुळे मी म्हणतो की जे काम झालं तो ट्रेलर आहे आणि अजूनही काम करण्याची इच्छा आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
#WATCH | On his ‘Vision 2047 ‘ for the country, PM Modi says, “This is not just Modi's vision, the ownership of this vision belongs to the whole country…I don’t want to waste even a minute…" pic.twitter.com/Jih70EEwuF
— ANI (@ANI) April 15, 2024
आपल्या 2047 च्या व्हिजनच्या संदर्भात सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा मी 100 दिवसांचा प्लान करत होतो. मी निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वीच काम करायला सुरू करतो. गेल्या दोन वर्षांपासून 2047 चे नियोजन सुरू केलं आहे. त्यासाठी देशभरातील नागरिकांकडून मते मागवली आहेत. ज्यापैकी 15 लाख नागरिकांचे मत जाणून घेतले. त्यानंतर एआयच्या मदतीने मी व्हिजन तयार केले. मग प्रत्येक विभागात पुढील 25 वर्षंसाठी कामासाठी अधिकाऱ्यांची एक टीम बनवली. त्यानंतर मी स्वत: एक बैठक बोलावून त्याच्या संदर्भात समजून घेतलं.
कसे होईल काम?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, माझा हा प्लान किंवा योजना हा मोदींचा वारसा नाहीये. ही 15 – 20 लाख लोकांची कल्पना आहे, विचार आहे. मी एका डॉक्युमेंटच्या स्वरुपात हे तयार करत आहे. निवडणुकीनंतर ही योजना, हा प्लान सर्व राज्यांना पाठवण्यात येईल. त्यानंतर सर्व राज्य या प्लानवर काम करतील. केवळ भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये हे काम होणार नाही तर संपूर्ण देशभरात होईल. या संदर्भात निती आयोगाची एक बैठक बोलावण्यात येईल आणि मग चर्चा करुन काम सुरू होईल. शेवटची याचा निकाल पहायला मिळेल.