गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊन आवक घटली आहे. राजमा, पावटा, मटारचे दर वाढले आहेत. मेथी, कोथिंबीर, पालक, आले, लसूण, चवळी, फ्लॉवर, कढीपत्ता, कारले आदींसह सर्व भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
तर टोमॅटोच्या दरातील वाढ अद्यापही कायम असून, ग्राहकांच्या खिशाला झळ बसत असल्याने गृहिनींना स्वयंपाक घरात टोमॅटोचा वापर जपून करावा लागत आहे. पावसामुळे पिकांची नासाडी होत आहे. परिणामी आवक घटल्याने उपलब्ध भाज्यांचे दर दुप्पट झाले.
शहरातील मोशी उपबाजार, आकुर्डी, पिंपरी येथील लाल बहादुर शास्त्री भाजी मंडई येथील किरकोळ दर
टोमॅटो 60, हिरवी मिरची 160, कवळा 80, राजमा 160, पावटा 120, वाल 120, पापडी 120, मटार 200, मेथी 30 रूपये जुळी, कोथंबिर 40, पालक 30, आले 170, लसूण 120 ते 150, कारली 70 रूपये प्रतिकिलोने विक्री होत आहे.
मोशी उपबाजारात टोमॅटो 210, हिरवी मिरची 70, कांदा 594, बटाटा 477, मटार 4, भेंडी 83, आले 23, कडीपत्ता 7, कारली 17, शेवगा 32 क्विंटलची आवक झाली आहे.
घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर टोमॅटो 40 ते 45, मिरची 70 ते 80, कांदा 7 ते 9, बटाटा 10, लसून 60 ते 70, आले 70 ते 80, भेंडी 40 ते 45, मटार 50 ते 55 रूपये दराने विक्री होत आहे.
मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 36,850 गड्डी, फळे 206 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 2627 क्विंटल एवढी आवक झाली.