१ जुलै २०२३ ला एलपीजी सिलेंडरच्या किंमती अपडेट होतील. गेल्या तीन महिन्यांपासून एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. तर या कालावधीत दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरच्या किमती २११९.५० रुपयांवरुन १७७३ रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत.
जिथे व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतींमध्ये ३४६.५० रुपयांची सवलत मिळाली आहे. तर घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये कोणताही दिलासा मिळालेला नाही.
गेल्या सहा महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती २ वेळा वाढल्या आहेत. तर ३ वेळा कमी झाल्या आहेत. एक डिसेंबर २०२२ ला १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे भाव दिल्लीत १७४४ रुपये आहेत. एक जानेवारीला किंमतीमध्ये २५ रुपयांची वाढ झाली आहे. किंमती १७६९ रुपयांवर पोहोचल्या आहेत.
महानगरांतील किंमती
दिल्ली – १७७३ रु.
कोलकाता – १८७५.५० रु.
मुंबई – १७२५ रु.
फेब्रुवारी महिन्यात त्यात कोणताही बदल झालेला नाही. एक मार्चला किंमतींत ३५०.५० रुपयांनी महाग होऊन २११९.५० रुपयांवर पोहोचल्या आहेत. एक एप्रिल २०२३ ला व्यावसायिक सिलेंडर ९१.५० रुपयांनी स्वस्त होऊन २०२८ रुपये झाल्या आहेत. एक मे रोजी किंमतींमध्ये घट करण्यात आली आहे. नवे दर १८५६.५० रुपये होत्या. यानंतर १ जूनला १९ किलोचा निळ्या रंगाचा सिवेंडर स्वस्त होऊन १७७३ रुपयांवर आला आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती
याऊलट १४ किलो वजनाच्या घरगुती सिलेंडरच्या किंमती ६ जुलै २०२२ नंतर एक मार्च २०२३ ला बदलण्यात आल्या. पेट्रोलियम कंपन्यांनी दिलासा देण्याऐवजी घरगुती गॅसच्या किंमती ५० रुपयांनी वाढवल्या. किंमत १०५३ रुपयांवरुन ११०३ रुपयांवर पोहोचल्या आहेत. हे मुंबईतील दर आहेत. आता १ जुलैला पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडरच्या किंमती अपडेट होणार आहेत. यंदा व्यावसायिक सिलेंडरसोबत घरगुती सिलेंडरच्या किंमतीतही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ‘आम आदमी’ व्यक्त करत आहेत.