ताज्या बातम्या

डिंकाच्या सेवनाने शरीराला मिळतील हे 8 आरोग्यदायी फायदे


डिंकाचे नाव ऐकताच तुमच्या मनात पहिली गोष्ट काय येते ? कागद आणि पुस्तके चिकटवण्यासाठीची उपयुक्त गोष्ट म्हणजे डिंक होय. या डिंकाचा उल्लेख एका चविष्ट पदार्थासोबत देखील केला जातो. तो उल्लेख म्हणजे डिंकाचे लाडू होय. डिंकाचे लाडू हे हिवाळ्यामध्ये आवर्जून केले जातात आणि खाल्ले जातात. हे डिंकाचे लाडू गरोदर महिलांना आवर्जून दिले जातात.

आजच्या लेखात आम्ही तुम्हाला खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणार्‍या खाण्याच्या डिंकाबद्दल सांगणार आहोत. हा एक पिवळसर चिकट, जाड द्रव आहे, जो झाडांमधून बाहेर पडतो, ज्याला डिंक असे म्हटले जाते. त्याचा प्रभाव हा थंड असतो, त्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन करणे अतिशय फायदेशीर मानले जाते. डिंक कटिरा’ हा डिंकातील द्रव सुकवून तयार केलेला कोरडा पदार्थ असतो. याचा बऱ्याचदा घरांमध्ये वापर केला जाते. हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. चला तर मग आज तुम्हाला डिंक कटिराचे फायदे आणि तोटे याची माहिती जाणून घेऊयात. •डिंक कटिराचे फायदे
1. कमजोरी दूर करण्यासाठी फायदेशीर:-डिंक कटिरामध्ये प्रथिने आणि फॉलिक अॅसिडचे प्रमाण भरपूर आहे. याच्या सेवनाने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. गोंड कटिरा पाण्यात किंवा दुधात भिजवून मग त्यात साखर मिसळून तुम्ही पिऊ शकता.

2. मासिक पाळी नियमित करण्यासाठी ठरते उपयुक्त:-जर स्त्रियांची मासिक पाळी नियमित येत नसेल तर डिंक कटिरा आणि पिठी साखर एकत्र बारीक करून 2 चमचे दुधात मिसळून प्यायल्यास फायदा होतो. या व्यतिरिक्त तुम्ही डिंकाचे लाडूही बनवू शकता आणि ते खाऊ शकता. एवढेच नाही तर बाळ झाल्यानंतर डिंकाचे लाडू खाल्ल्याने अशक्तपणा आणि मासिक पाळीचा त्रासही दूर होण्यास मदत होते.

3. वजन कमी करण्यात सहाय्यक
डिंक कटिरा हा आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यात मदत करते. यासोबतच आपल्या शरीरातील चयापचयाची क्रिया वाढवण्यात डिंक कटिरा मदत करते. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. शिवाय, हे पोट आणि पचनसंस्था सुधारण्यासाठी देखील आवर्जून वापरले जाते. या डिंकाच्या नियमित सेवनाने शरीरावर जमा होणारी अतिरिक्त चरबी देखील कमी होते.

4. पुरुषांमध्ये कामवासना वाढवते:-डिंक कटिराच्या सेवनाने पुरुषांमध्ये लैंगिक ताकद आणि इच्छा वाढते. याच्या नियमित सेवनाने इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्याही दूर होते.

5. टॉन्सिल्सच्या त्रासापासून आराम मिळतो
काही जणांना टॉन्सिल्सची समस्या नेहमी जाणवते. हिवाळ्यात हा त्रास आणखी वाढतो. डिंक कटिराच्या सेवनाने तुम्हाला टॉन्सिल्सच्या त्रासापासून आराम मिळतो. यामध्ये कोथिंबीरीचा रस मिसळून नियमितपणे गळ्याजवळ आणि घशावर लावल्याने टॉन्सिल्सच्या वेदनांपासून आराम मिळतो. या व्यतिरिक्त सुमारे 10 ते 20 ग्रॅम डिंक कटिरा पाण्यात भिजवा. त्यानंतर तो चांगला फुगल्यानंतर त्यात साखर मिसळून सकाळ-संध्याकाळ प्या. यामुळे तुम्हाला टॉन्सिल्सच्या त्रासापासून आराम मिळतो.

6. ​तोंडात येणाऱ्या फोडांपासून मुक्ती मिळते:-अनेकांना उष्णतेचा त्रास असतो. या उष्णतेमुळे तोंडात फोड येणे, अल्सर किंवा सूज येणे आदी समस्या निर्माण होतात. यामुळे तुम्हाला असह्य वेदना होतात. या वेदना कमी करण्यासाठी डिंक कटिराची बारीक केलेली पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट त्या फोडांवर लावा. हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच तोंडात येणाऱ्या फोडांपासून मुक्ती मिळेल.

7. स्तनांचा आकार वाढवण्यासाठी उपयुक्त:-डिंक कटिरा खाल्ल्याने स्तनांचा आकार वाढण्यास मदत होते, असे म्हटले जाते. यासाठी एक चमचा डिंक कटिरा एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी या फुगलेल्या डिंक कटिरामध्ये साखर मिसळून खा.

8. उष्माघात आणि हीट स्ट्रोकपासून बचाव करते
उन्हाळ्यात उष्माघात आणि हीट स्ट्रोक हे खूप धोकादायक असतात. यामुळे शरीरावर जळजळ आणि लालसरपणा येतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 2 चमचे डिंक कटिरा 1 ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. जेव्हा हा डिंक चांगला फुगून येईल तेव्हा त्यात साखर मिसळून हे मिश्रण खा. याच्या सेवनाने उन्हाच्या तीव्र झळा आणि उष्माघातापासून तुमचा बचाव होतो.

​डिंक कटिराचे साईड इफेक्ट्स
डिंक कटिराचे कोणतेही वेगळे साईड इफेक्ट्स होत नाहीत. याचा उपयोग विविध खाद्यपदार्थांमध्ये केला जातो.
डिंक कटिराचे सेवन करण्यापूर्वी आपले शरीर हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे. हे नसा आणि आतडे ब्लॉक होण्यापासून बचाव करते.काहीवेळा याच्या सेवनामुळे क्विलियाच्या सालाची अ‍ॅलर्जी असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे याचे सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच डिंक कटिराचे सेवन करावे.
डिंक कटिराचे उपयोग (Usage Of Gond Katira)
फूड इंडस्ट्रीमध्ये डिंकाचा (डिंक कटिरा) वापर अनेक प्रकारे केला जातो. चला तर मग याचे उपयोग जाणून घेऊयात.

1. चरबीचा पर्याय म्हणून
अनहेल्दी फॅट अर्थात चरबीला हेल्दी फॅटच्या पर्यायांमध्ये बदलण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून फूड इंडस्ट्रीमध्ये केले जात आहेत. डिंक कटिरा हा असाच एक उत्तम पर्याय आहे, जो अनेक पॅकेज्ड करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांमध्ये यशस्वी ठरला आहे. त्याच्या चिकट प्रभावामुळे तो एक चांगला बंधनकारक घटक बनतो आणि अन्नपदार्थ देखील पूर्वीपेक्षा कितीतरी पटींनी अधिक आरोग्यदायी बनतात.

2. सूक्ष्मजीवांच्या विरोधात:-बर्‍याच संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, डिंक बॅक्टेरिआ आणि इतर सूक्ष्मजीवांच्या विरोधात अतिशय प्रभावी आहे. जिवाणूंच्या प्रभावापासून अन्नपदार्थांचे संरक्षण करण्यासाठी डिंक कटिराचा वापर केला जातो. सध्या जगभरातील अनेक प्रयोगशाळांमध्ये डिंक कटिरा औषधांच्या रुपात वापरण्यासंदर्भात संशोधन सुरू आहे.

3. मधुमेहासाठी औषध म्हणून वाहकाच्या रुपात
शरीरामध्ये इन्सुलीन वाहून नेणाऱ्या कॅप्सूल बनवण्यासाठी डिंक कटिरा वापरता येतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्यांना इंजेक्शनद्वारे इन्सुलीन घ्यावे लागते, त्यांच्यासाठी हा एक उत्तम मौखिक पर्याय आहे. डिंकाचा असलेला चिकट आणि चिवट गुणधर्म त्याला एक चांगला वाहक बनवते. या विषयावर सध्या संशोधन सुरू असून पुढील काही वर्षांमध्ये वैद्यकीय शास्त्राची ही एक अद्भुत प्रगती ठरू शकते.

4. खाद्यपदार्थ घट्ट करणारा एजंट म्हणून:-विविध खाद्यपदार्थांमधील स्निग्धता वाढवण्यासाठी डिंक कटिरा हा एक उत्तम पर्याय आहे. खाद्यपदार्थ गरम केल्यानंतर ते उष्णता आणि अ‍ॅसिडीटी यामध्ये ही स्थिर राहते. बाजारात उपलब्ध असलेल्या सॅलेड ड्रेसिंग्स, लोणचे, केचअप, मेयॉनीज इत्यादींसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. त्याचे अ‍ॅंटी-अ‍ॅसिडिक गुणधर्म खाद्यपदार्थ अधिक काळ टिकतात आणि त्यांना अधिक काळ फ्रेश ठेवण्यास मदत करते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *