Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

अर्धांगवायूचा झटका आल्याने एका बंदीवासाचा मृत्यू

Spread the love

उदय उर्फ बाबा भोला भारती असे मृत कैद्याचे नाव आहे. उद्य या कैद्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सदर कैदी प्रदिर्घ काळापासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील शिक्षा भोगत होता. गेल्या शनिवारी (दि.१) त्यास पक्षाघाताचा त्रास झाला. जेलरक्षक गोपाल सुरकुटलवा यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता सोमवारी (दि.१७) उपचार सुरू असतांना डॉ.राहूल भराटे यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हांडोरे करीत आहेत.
…
वेगवेगळया भागात शहरात राहणा-या दोघांची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया भागात शहरात राहणा-या दोघांनी गुरूवारी आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी पोलिस दप्तरी वेगवेगळय़ा मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

पहिली घटना एकलहरारोड भागात घडली. महेश रघूनाथ गायकवाड (२३ रा.मगरमळा,एकलहरारोड) या युवकाने गुरूवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पंख्याच्या हुकास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत रघूनाथ गायकवाड यांनी खबर दिली. दोन्ही घटनांप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात वेगवेगळय़ा मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास पोलिस नाईक पाटील करीत आहेत.

दुस-या घटनेत देविदास जगन्नाथ खैरनार (६० मुळ रा.वाडीबर्डी ता.मालेगाव हल्ली अनिल नागरे यांच्या मळयात चाडेगाव पाटाजवळ) यांनी बुधवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून अ‍ॅसिड सेवन केले. ही बाब निदर्शनास येताच शेत मालक अनिल नागरे यांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *