गढी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ : विजयसिहराजे पंडित यांच्या हास्ते संपन्न
गढी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ : विजयसिहराजे पंडित यांच्या हास्ते संपन्न
बीड : ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथे विविध विकास कामाचा शुभारंभ दि 8 / 3 / 2023 रोज बुधवार सकाळी 11 = 00 वाजता संपन्न झाला गढी ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी निधी मिळत आहे . गावातील विकास कामे दर्जेदार करून घेण्याची जवाबदारी ग्रामस्थांची आहे. यासाठी सर्वानी गट – तट वगळून एकत्र येणे गरजेचे आहे . तेव्हा विकास कामांत कोणीही राजकारण करू नये आसे प्रतिपादन विजयसिंह पंडित यांनी केले त्यांच्या शुभ हस्ते गढी ग्रामपंचायत अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन . जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्याच्या बांधकामाचा व समाजमंदीर आणि आंगणवाडीच्या इमारतीचा लोकार्पण करण्यात आला या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
गढी या गावासाठी 33 लक्ष 37 हजार रुपये किमतीच्या घनकचरा व साड पाणी व्यवस्थापन व 18 लक्ष 37 हजार रुपये किंमतीच्या दोन वर्ग खोल्यांच्या बांधकामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला या कार्यक्रमात 10 लक्ष रुपये किंमतीच्या समाजमंदिर व 8 . 50 लक्ष रुपये किमतीच्या आंगणवाडी बांधकामाचा लोकार्पन करण्यात आला यावेळी जय भवानीचे व्हाईस चेअरमन जगन्नाथ शिंदे बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे माजी सभापती कुमारराव ढाकणे माजी जि प . सदस्य बाबुराव काकडे . राष्ट्रवादी . युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे . कारखान्याचे संचालक श्रीराम आरगडे . यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते . गढी ग्रामपंचायतचे सरपंच आकुशराव गायकवाड . मंगेश कांबळे . ग्रामपंचायत सदस्य बंजरंग ( दादा ) आर्सूळ . विष्णूपंत घोगडे . ईत्यादीने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले . यावेळी बोलताना विजयसिह पंडित म्हणाले की आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होतील ग्रामपंचायत व सेवा संस्थाच्या निवडणूकांमध्ये ज्या पध्दतीने सर्वानी एकजुटीने प्रयत्न करून यश मिळविले तसे सर्वानी एकत्रितरित्या निवडणूकाला सामोरे जाण्यासाठी मैदानात उतरणे आवश्यक आहे आता निवडणूकीच्या तयारीला सर्वानी लागावे आसे आवाहन विजयसिह पंडित यांनी केले या कार्यक्रमाला वडगाव ढोकचे सरपंच सचिन ढाकणे चेअरमन अशोक नाईकवाडे . रांजणीचे सरपंच आसाराम रोडगे . खांडवीचे सरपंच गोपाळ शिदे बळीराम चव्हाण रामदास मुंढे . बंजरंग मोरे . दिलीप नाकाडे . आशोक मोटे . सुमित काळम . अमोल ससाणे जालिदर उगलमुगले . उद्धव नाकाडे . डॉ चद्रशेखर गवळी . मधूकर गायकवाड . महेश सिकची गोवर्धन गायकवाड यांच्यासह गढी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते