“सेक्सुअलिटी कोच म्हणजे मी सेक्स शिकवते असंच लोकांना वाटायचं.”
सेक्स कोच म्हणून काम करत असलेल्या पल्लवी बरनवाल स्वतः विषयी सांगतात.
मागील पाच वर्षांपासून त्या सेक्स कोच म्हणून काम करत आहेत. सेक्स कोचचं काम लोकांना त्यांच्या लैंगिक समस्यांविषयी मार्गदर्शन करणं, त्यावर उपाय सांगणं हे असतं.
त्यांच्या मते, “भारतात अजूनही सेक्स थेरपीविषयी लोकांनी माहिती नाहीये. अमेरिकेत सेक्स थेरपी केली जाते. तिथं सेक्स थेरपिस्ट असतात. मी यूएस मधील अनेक नामांकित सेक्स थेरपिस्टकडून प्रशिक्षण घेतलं आहे.
“एलजीबीटी चळवळीमुळे आपल्याकडे आता सेक्सुअलिटीबद्दल माहिती उपलब्ध होत आहे. सेक्सुअलिटीबद्दल लोकांचे अधिकार असतात याचीही जाणीव आता लोकांना होत आहे.”
“जेवढा महत्वाचा हा विषय आहे तेवढ्याच प्रमाणात याबद्दल चुकीच्या पद्धतीने पहिले जाते. त्यामुळे या माहितीच्या अभावामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. एखाद्या बालकाचे लैगिक शोषण झाले तर त्याच्याकडे शोषण झालं हे सांगण्यासाठी शब्द नाहीत,” असंही पल्लवी सांगतात.
सेक्स कोच बनण्यामागे कारण
पल्लवी यांच्या मते त्यांच्या घरातील जुन्या विचारांचा पगडा हा त्यांच्या सेक्स कोच बनण्यामागचे कारण आहे.
त्या सांगतात, “मी लहान असताना आमच्या घरात ब्रा शब्दाचा उच्चार देखील चालत नव्हता. आमच्या घरात तो एक टेप असल्याचं सांगितलं गेलं.”
“तेव्हा मला ते खूप विचित्र वाटले आणि घरात त्याविषयी बोलण्यास मनाई होती. त्यामुळे खूप दिवस मी ब्रा वापरलीच नाही कारण मला त्याबद्दल खूपच अस्वस्थ वाटत होतं.”
मुलासोबत सेक्स एज्युकेशनवर चर्चा
अनेक घरातील पालक त्यांच्या मुलांना माझ्याशी बोलू देत नाहीत. कारण त्यांना वाटतं कि माझ्याशी बोलल्याने त्यांना चुकीचे शिक्षण मिळेल, असं त्या सांगतात.
पण, माझ्या मुलासाठी सेक्स एज्युकेशन हा आता सामान्य विषय झाला आहे, असं त्या सांगतात.
“माझ्या मुलाला त्याच्या एका मित्राने विचारले कि तुझी आई करते. त्यावर त्याने उत्तर दिले कि माझी आई सेक्स कोच आहे. त्यावेळी तिथे त्या मुलाची आई उभी होती. अर्थातच त्यावर काय प्रतिक्रिया आली असेल तुम्हाला समजलं असेल. तेव्हा मी माझ्या मुलाला समजावलं कि इंटिमसी कोच सांगू शकतो.”
लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात?
लोकांच्या प्रतिक्रियेविषयी विचारल्यावर पल्लवी म्हणतात, “माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितले कि पल्लवी तुझ्या लग्नाला खूप त्रास होईल कारण कोणतेही भारतीय कुटुंब अशी सून कधीही स्वीकारणार नाहीत, जी सेक्सुअलिटी कोच आहे.”
पल्लवी यांनी सोशल मीडियावर एक पेज तयार केले आहे तिथे त्या लोकांना या विषयावर बोलण्यास प्रवृत्त करतात.
https://www.instagram.com/reel/CdfTcVBFzt2/?igshid=YmMyMTA2M2Y=
सोशल मीडियावर लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्याचे देखील त्या सांगतात.
“सोशल मीडियावर या विषयाला समर्थन तर मिळतंय पण हे समर्थन निनावी स्वरूपाचे आहे. कारण लोकांच्या मते सेक्स शब्द लिहला म्हणजे मला लगेच वाईट माणूस म्हणून चारित्र प्रमाणपत्र दिले जाईल.
“अनेक लोक याविषयी बोलू इच्छितात पण त्यांच्या मनात भीती असते कि मी या विषयवार बोललो तर लोक माझ्याविषयी काय मत बनवतील.”
काही लोकांकडून याविषयी चांगल्या प्रतिक्रिया देखील येतात, असं त्या सांगतात.
अनेकजण सांगतात की, तुम्ही लिहलेले लेख वाचून, व्हिडीओ पाहून मला माझ्या आयुष्यात ही अडचण असल्याचे समजले.
घरच्यांकडून विरोध पण.
हे करत असताना अनेक अडचणी आल्याचे देखील त्या सांगतात.
“सुरुवातीला घरच्यांकडून याला विरोध होता. पण जेवढा मी विचार केला होता तेवढा विरोध झाला नाही.
“जेव्हा राष्ट्रीय पातळीवर मला नामांकन मिळायला लागल्यानंतर माझ्या वडिलांना असं वाटलं कि मासिक, वृत्तपत्रे याविषयी बोलत आहेत तर काहीतरी योग्य काम करत आहे.”
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही.