मुंबई,ई-श्रम पोर्टलवर e-labor portal आतापर्यंत जवळपास 20 कोटी कामगार/श्रमिकांची नोंदणी झाल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या आकडेवारीची माहिती होण्यासाठी केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टलची सुरुवात केली होती.
गेल्या 24 तासांत देशभरातून 37 लाख 23 हजार 639 जणांनी यावर नोंदणी केल्याची श्रम आणि रोजगार मंत्रालयाची माहिती आहे. यामध्ये 52.83 टक्के महिला, तर 47.17 टक्के पुरुष कामगार आहेत. श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ही आकडेवारी अद्ययावत केली आहे. ई-श्रम पोर्टलची सुरुवात झाल्यापासून त्यावर सर्वांत जास्त नोंदणी उत्तरप्रदेशातून झाली आहे. उत्तरप्रदेशातल्या जवळपास 7 कोटी 27 लाख 71 हजार 500 नागरिकांनी यावर नोंदणी केली आहे.
त्यानंतर पश्चिम बंगालमधून 2 कोटी 39 लाख 05 हजार 965 इतक्या जणांची नोंदणी झाली आहे. बिहारमधल्या 1 कोटी 90 लाख 74 हजार 046, ओडिशामधल्या 1 कोटी 28 लाख 53 हजार 07 आणि झारखंडमधल्या 70 लाख 96 हजार 842 कामगारांची नोंदणी यावर झाली आहे. या सर्वांना ई-श्रम कार्ड देण्यात येणार आहे. या ई-श्रम कार्डचे e-labor portal अनेक फायदे त्यांना मिळू शकतील. असंघटित क्षेत्रातले बांधकाम मजूर, स्थलांतरित मजूर किंवा तात्पुरत्या स्वरूपाची कामे करणारे, तसेच व्यासपीठावर काम करणारे मजूर, फिरते विक’ेते, घरकाम करणारे, कृषी कामगार यांची माहिती मिळवण्यासाठी श्रम मंत्रालयाने हे ई-श्रम पोर्टल गेल्या वर्षी 26 ऑगस्ट रोजी सुरू केले आहे.