Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

अजितदादानंतर सुनेत्रा पवार यांचा पहिला प्रचंड विजय, सोमेश्वर कारखाना निवडणुकीत उघडलं खातं

बारामतीतील सोमेश्वर कारखाना निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा प्रचंड विजय होताना दिसत आहे.

या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलनं खातं उघडलं आहे. त्यांच्या एका उमदेवाराचा विजय झाला आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर एखाद्या निवडणुकीतील सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच मोठा विजय आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.

सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल यायला सुरु झाल आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने खातं उघडलं आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे उमेदवार संग्राम सोरटे हे ब वर्ग गटातून विजयी झाले आहेत. संग्राम सोरटे यांना 131 पैकी 92 मत मिळाली आहेत. सुनेत्रा पवार आणि त्यांच्या पॅनलसाठी हा मोठा विजय मानला जात आहे. ही निवडणूक केवळ बारामतीची असली तरी संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. अजितदादा यांच्या नंतर सुनेत्रा पवार या कशा कामगिरी करतात याकडे हे लक्ष लागलं होतं.

21 पैकी 21 जागा जिंकणारच…

दरम्यान, सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही 21 पैकी 21 जागा जिंकणारच असा निर्धार खासदार पार्थ पवार यांनी केला होता. सोमेश्वर साखर कारखान्याच्या 21 संचालक पदाच्या जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत विजय व्हावा म्हणून पार्थ पवार यांनी विविध मतदान केंद्रांवर जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. सोमेश्वर निवडणुकीत 21-0 असा निकाल लागेल, अशी शक्यता असून आमची वाटचाल त्या दिशेने सुरू आहे. विजयाची वाटचाल सुकर होत चालली आहे, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं होतं.

तिरंगी लढत

दरम्यान, सोनेश्वर कारखान्यावर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांचं निर्विवाद वर्चस्व आहे. त्यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करून संजय जगताप यांच्या मदतीने लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल उभं केलं होतं. या निवडणुकीत तिरंगी लढत होती. मात्र, पहिल्या निकालातूनच जगताप यांना धक्का बसणार असल्याचं दिसून येत आहे. दुपारपर्यंत या निवडणुकीचे सर्व निकाल हाती येणार असून त्यात कुणाचं वर्चस्व राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *