Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

मुलीच्या प्रेमविवाहामुळे कुटुंबावर जातपंचायतीचा बहिष्कार; एक लाखांचा दंड

मुलीने जातीतील मुलाशी प्रेमविवाह केल्याने तिच्या संपूर्ण कुटुंबाला समाजाच्या जातपंचायतीने जातीतून बहिष्कृत केल्याचा प्रकार तालुक्यातील धामोरी येथे घडला आहे. या कुटुंबाला एक लाखाचा दंडही जातपंचायतीने ठोठावला असून, त्यातील पन्नास हजार रुपये वसूलही केले आहे. धामोरी येथील या कुटुंबातील सज्ञान मुलीने तिच्या जातीतीलच एका मुलासोबाबत प्रेमविवाह केला; परंतु त्या समाजाच्या जातपंचांनी तो विवाह अमान्य केला. धामोरी येथे त्याबाबत जातपंचायत भरवून पीडित कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. हे कुटुंब अत्यंत गरीब असून, पालामध्ये राहत सुया-फण्या विकून उपजीविका करत आहे. तरीही त्यांनी पन्नास हजार रुपये जातपंचायतीला दिले. उरलेली रक्कम पीडित कुटुंब देऊ शकले नाही.

त्यामुळे जातपंचांनी संपूर्ण कुटुंबाला अमानुष मारहाण केली. त्यांच्याशी कुणीही बोलण्याचे नाही. सुख-दुःखाच्या प्रसंगात बोलवायचे नाही अन्यथा त्यांनाही दंड करून जातीबाहेर काढू, असा फतवा काढला. त्यांच्या मुलीला पण भेटू दिले जात नाही. कुटुंबाला जातपंचायतीकडून दिला जाणारा जाच, छळ कमी झाला नाही. जातपंचायतीच्या अन्यायकारक निवाड्यामुळे मुलीच्या वडिलांना स्वतःच्या भावाच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहता आले नाही. अशा प्रकारच्या अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जाण्यापासून या कुटुंबाला रोखण्यात आले आहे.

दरम्यान, या पीडित कुटुंबाने याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) माजी अध्यक्ष अविनाश पाटील यांच्याकडे तक्रार केली. जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे व कोपरगाव अंनिसचे अध्यक्ष डॉ. अशोक गावित्रे यांनी पीडितांसह कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे गाठले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *