अरेरे पाकिस्तानची किती लाचारी, डोनाल्ड ट्रम्प यांना दिले थेट पत्रच, भारताच्या तळपायाची आग मस्तकाला, थेट UN मध्येच..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. त्यातच भारत आणि अमेरिका यांचे संबंध तणावात आहेत. भारतावर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहलगाम हल्ल्यानंतर स्थिती गंभीर झाली होती. दोन्ही देशांकडून मोठे हल्ले केले जात होते. युद्धाची स्थिती होती. त्यावेळी दोन्ही देशांनी चर्चा करून मध्यस्थी केली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने भारत आणि पाकिस्तान युद्ध मीच थांबवल्याचा दावा केला जातो. भारताने स्पष्ट केले की, दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी चर्चा करून युद्ध थांबवले आहे. त्यात कोणत्याही तिसऱ्या देशाचा हात नाही. भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा असल्याचे सांगितले पण पाकिस्तान यावर माैन बाळगून आहे. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक मंचावर पुन्हा एकदा भारत पाकिस्तान युद्धाबाबत धक्कादायक दावा केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्रात संबोधित करताना म्हटले की, त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील 8 वे युद्ध थांबवले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध वाढण्यापासून त्यांनी रोखले. ज्या ज्या देशांमधील मी युद्ध मी थांबवले, त्या देशांच्या नेत्यांनी मला पत्र लिहित आभार मानले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मला 3 कोटी लोकांचे जीव वाचवल्याबद्दल पत्र लिहित माझे आभार मानले.
कदाचित त्याच्यापेक्षाही अधिक लोक त्यात असते. डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच आपण युद्धात किती लोकांना वाचवले हे सांगितले. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. ज्यात 26 भारतीय लोकांचा जीव गेला. त्यानंतर दोन्ही देशात प्रचंड मोठा तणाव वाढवा. भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मोठे हल्ले केले.
पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवाद्यांचे हल्ले भारताने उद्धवस्थ केली. त्यानंतर तणाव अधिक वाढला. भारताने वारंवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केलेला दावा खोडला आहे. या युद्धात 11 लढाऊ विमाने पाडण्यात आली, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. मात्र, नक्की कोणत्या देशाची भारत की पाकिस्तान कोणाची लढाऊ विमाने पाडण्यात आली, हे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले नाही.



