Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

UNSC : चांगली बातमी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरुपी सदस्यत्वाचं समर्थन करण्यासाठी अजून चार देश आले पुढे

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं कायमस्वरुपी सदस्यत्व मिळावं यासाठी भारत गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. या संदर्भात संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्रादरम्यान न्यू यॉर्कमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि वाइसेग्राड ग्रुपमध्ये पहिली हायलेवल बैठक झाली.

जयशंकर यांनी बैठकीच्या पार्श्वभूमीवर स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांची भेट घेतली. त्यांनी UNSC मध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाला समर्थन दिलं. “V4 ची बैठक म्हणजे ऐतिहासिक संधी असल्याचं जयशंकर म्हणाले. ही एक ऐतिहासिक संधी होती. आज आम्हाला इथे बोलावल म्हणून मी मंत्री जुराज यांचे आभार मानतो. ही खूप उपयुक्त बैठक होती” असं एस. जयशंकर म्हणाले. “युरोपियन यूनियन सोबत दृढ संबंध झाले पाहिजेत हे आम्ही ठरवलय. म्हणून V4 सोबत मिळून एका वार्षिक बिझनेस फोरमची स्थापना करणार आहोत. परराष्ट्र मंत्री स्तरावर दरवर्षी बैठक करणार आहोत” असं जयशंकर यांनी सांगितलं.

जयशंकर यांनी एक्सवर V4 बैठकीचे फोटो शेअर केले. “आज दुपारी न्यू यॉर्कमध्ये आपल्या युरोपियन युनियनच्या सहकाऱ्यांना भेटून खूप चांगलं वाटलं #UNGA81. भारत-EU सहकार्य, मल्टीलेटरल मुद्दे, गल्फ, यूक्रेन आणि इंडो-पॅसिफिकसह विद्यमान स्थितीवर चर्चा झाली” असं जयशंकर यांनी लिहिलं आहे. V4 देशांसोबत संरक्षण क्षेत्रात भारताचा एक मजबूत इतिहास राहिला आहे. त्यांना ते सहकार्य पुढे न्यायचं आहे असं जयशंकर यांनी सांगितलं. बैठकीत अवकाश, टेक्नेलॉजी, कनेक्टिविटी, शिक्षण या मुद्यांवर चर्चा झाली. त्या शिवाय युक्रेन संघर्ष आणि आखातातल्या परिस्थिती संदर्भात मोठ्या जागतिक संकटांवर चर्चा झाली.

आम्ही द्विपक्षीय अजेंड्यावर चर्चा केली

V4 बैठकीशिवाय जयशंकर यांनी स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांच्यासोबत सुद्धा महत्वाची बैठक केली. “आज स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांना भेटून आनंद झाला. आम्ही द्विपक्षीय अजेंड्यावर चर्चा केली. त्याशिवाय बहुपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यावर सुद्धा चिंतन केलं” असं जयशंकर यांनी सोशल मीडियावर लिहिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *