Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या अडचणीत वाढ, ते वादग्रस्त विधान भोवले, अटकेची टागंती तलवार, अपडेट काय?

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका सार्वजनिक कार्यक्रमात भाषण करताना ढोबळे यांची जीभ घसरली होती. त्यांनी भाषण करताना जातीवाचक वक्तव्य केले होते. तर महिलांबद्दलही अपशब्द वापरले होते.

आता सकल मातंग समाजाच्या मोर्चाच्या स्टेजवरून जाती वाचक भाष्य आणि महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारीनंतर गुन्हा दाखल

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या विरोधात नांदेड मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातीवाचक भाष्य आणि विशिष्ट समाजाच्या महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी नांदेड शहरातील वजीराबाद पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 सप्टेंबर रोजी नांदेड मध्ये आरक्षण उपवर्गीकरनाच्या समर्थनात सकल मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी भाषण करताना जातीवाचक भाष्य केले तसेच एका जातीच्या महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. याबाबत माजी नगरसेविका अंजली गायकवाड यांनी तक्रार दिलीये. त्यावरून रात्री वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *