Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

UPI शुल्कावर फडणवीसांची स्पष्ट भूमिका; व्यापारी-पेट्रोल पंपधारकांना म्हणाले, ‘विरोध करू नका’

मुंबई: यूपीआय आणि डिजिटल व्यवहारांमुळे व्यापार वाढला असून व्यवहारही पारदर्शक बनले आहेत. लोकही मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर करत आहेत. व्यापारवाढीसोबतच देशातील भ्रष्टाचार कमी करण्यातील यूपीआयची भूमिका सर्वांनी समजून घेतली पाहिजे.

ही प्रक्रिया अशीच पुढे नेण्यासाठी अत्यंत नाममात्र स्वरूपाच्या यूपीआय शुल्काला व्यापारी किंवा पेट्रोल पंपधारकांनी विरोध करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

नागपूर येथील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत अवाडा ग्रुपच्या सोलार प्लांटच्या पाहणीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. संसदीय समितीनेही अशा शुल्काची शिफारस केली होती. या समितीत पी. चिदंबरम यांच्यासह चार ज्येष्ठ काँग्रेस नेते होते.

दरम्यान, काही विशिष्ट व्यवहारांवरच हे शुल्क लागणार आहे. तरीही एक प्रकारे ‘नरेटिव्ह’ तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यापार वाढीसोबतच देशातील भ्रष्टाचार कमी करण्यात यूपीआयची भूमिका सर्वांनी समजून घेतली पाहिजे, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.

नागपूर सोलर माॅडेलचे मुख्य केंद्र बनेल

नागपूरच्या बुटीबोरी येथे आवाडा कंपनीच्या माध्यमातून सोलर मॉड्युलची एक सुपर फॅक्टरी उभारण्यात आली असून यामार्फत भारताला सोलर क्षेत्रात अग्रेसर करण्याचे काम होत आहे. येत्या काळात नागपूर हे सोलर मॉडेलमधील परिसंस्थेचे एक मुख्य केंद्र म्हणून उदयास येईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

राहुल गांधींनी मिमिक्री करावी

राहुल गांधी यांनी आता स्टँडअप कॉमेडियनचे काम स्वीकारून मिमिक्री करावी. तिथे तरी किमान त्यांना चांगला रोजगार मिळू शकेल. त्यांनी काँग्रेसला तर बेरोजगार करून टाकले आहेच, असा उपरोधिक टोला फडणवीस यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *