Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

माजी आमदाराचा काँग्रेसला ‘जय महाराष्ट्र’! भाजपमध्ये पक्षप्रवेशाची तारीखही ठरली.

बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चिखली विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. बोंद्रे यांनी काँग्रेसची साथ सोडली असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

येत्या २२ सप्टेंबर रोजी राहुल बोंद्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असून मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

राहुल बोंद्रे यांनी फेसबुक लाईव्ह करून मी लवकरच काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याच जिल्ह्यात काँग्रेसला धक्का बसला आहे.

बोंद्रे यांनी फेसबूकवर व्हिडिओ पोस्ट करत सांगितले की, ‘मागील २५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून मी राजकारण, सहकार, शिक्षण, बँकिंग आणि विविध क्षेत्राच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यासोबत नाळ जोडली आहे. लोकांच्या संपर्कात राहून सेवा करत आहे. तर मी असो किंवा माझ्या परिवाराने राजकारणाकडे कधी व्यवसाय म्हणून पाहिले नाही. याकडे फक्त सेवा करण्याचे माध्यम असे पाहिलं आहे.

या राजकीय प्रवासात मी सातत्याने माझ्या पक्षासोबत, जनतेसोबत प्रामाणिक राहिलो. हीच माझी संपत्ती आहे. तुमचा विश्वास हाच माझ्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही, माझी जात, धर्म, पक्ष बघितला नाही. या सर्व भिंती तोडून मतदाराने मतदान केलंत. आपल्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे प्रेम दिलं.

पण राजकीय आयुष्यात अनेकदा निर्णय घेणं फार अवघड असतं. अनेक आठवणी, नाती आणि संबंध असतात, अशावेळी निर्णय घेणं फार अवघड असतं असं म्हणत त्यांनी आता एक अवघड निर्णय घ्यावा लागणार आहे. तसेच हा निर्णय आपल्या स्वार्थासाठी किंवा कोणत्या पदासाठी नाही तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या सर्वांसाठी आहे.

तर चिखलीच्या राजकारणाची भविष्य ठरवण्यासाठी तो निर्णय घेत आहे. काहींना याबाबत प्रश्न पडू शकतात. काहींना तो पटेल तर काहींना वेळ लागेल. पण मी इतकचं सांगेन की राहुल बोंद्रे मागी २५ वर्षात कधी बदलला नाही, पुढेही बदलणार नाही.

मार्ग बदलला पण माणसं नाही. माझा उद्देश नाही, राजकारणाची दिशा बदलेल पण मार्ग नाही, असे म्हणत ज्या पद्धतीने आतापर्यंत साथ दिली तशीच पुढेही द्या असा साद त्यांनी कार्यकर्त्यांना घातली आहे. तसेच यावेळी बोंद्रे यांनी काँग्रेससोबतच्या आपल्या प्रदीर्घ प्रवासाच्या आठवणींना उजाळा देखील दिला आहे. तर आता आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे राहुल बोंद्रे यांनी या स्पष्ट केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *