Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

गोष्ट मुंबईच्या अंडरवर्ल्डची- बॉम्बस्फोट की अंतर्गत वाद? दाऊद टोळीपासून छोटा राजन कसा फुटला?

मुंबईच्या गुन्हेगारी जगताचा इतिहास अभ्यासताना छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम  यांच्यातील संघर्षाचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनंतर छोटा राजनने ‘हिंदू डॉन’ अशी स्वतःची प्रतिमा तयार करत दाऊदशी फारकत घेतली, असा सर्वसामान्य समज आहे; परंतु गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते या दोघांमधील दुरावा बॉम्बस्फोटांआधीच सुरू झाला होता.

प्रत्यक्ष गुन्ह्यांत सहभाग

करीम लाला- हाजी मस्तान- वरदराजन मुदलियार या त्रिकुटाने मुंबईतील गुन्हेगारी जगतावर राज्य केलेले असले तरी त्यांच्यात एक सुप्त करार होता. काही केल्या एकमेकांच्या हद्दीत शिरायचे नाही. पण दाऊदने ते पाळले नाही. दाऊदला थेट टक्कर दिली ती अरुण गवळीने. दाऊद कधीही प्रत्यक्षात गुन्ह्यांत सहभागी झाला नाही. गवळी काय किंवा छोटा राजन या दोघांनीही सुरुवातीला प्रत्यक्ष गुन्ह्यांत सहभाग घेतला होता.

गुन्हेगारी जगतात अभूतपूर्व रक्तपात

अरुण गवळीने दाऊदशी फारकत घेतल्यानंतर दोन्ही टोळ्यांमध्ये प्रचंड संघर्ष सुरु झाला. दाऊदची आर्थिक आघाडी सांभाळणाऱ्या सतीश राजेची गवळीने हत्या केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून दाऊदने गवळीचा भाऊ किशोर ऊर्फ पापा गवळीची हत्या घडवून आणली. त्यानंतर गुन्हेगारी जगताने अभूतपूर्व असा रक्तपात अनुभवला. गवळी- दाऊद संघर्षात नामचीन गुंड ठार होत होते. परंतु त्याचवेळी या टोळ्यांची दहशतही वाढत होती. दुबईत राहून मुंबईच्या गुन्हेगारीवर वर्चस्व गाजवणाऱ्या दाऊदचा छोटा राजन म्हणजेच राजन सदाशिव निकाळजे ऊर्फ नाना हा खास व विश्वासू हस्तक. पूर्व उपनगरात विशेषत: टिळकनगर परिसरात छोटा राजनची कमालीची दहशत होती.

दाऊदचा भाऊ शब्बीरची हत्या

सुरुवातीला छोट्या-मोठ्या मारामाऱ्या, हप्तेवसुली आणि चेंबूरच्या सहकार व अशोक सिनेमागृहाजवळ तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या छोटा राजनला तसे फारसे कुणी ओळखत नव्हते. कारण छोटा राजन हा बडा राजन म्हणजेच राजन नायरसाठी काम करीत होता. बडा राजन हा वरदाभाईसाठी व पर्यायाने दाऊदसाठी काम करीत होता. जेव्हा दाऊदचा भाऊ शब्बीरची हत्या झाली तेव्हा दाऊदसाठी काही तरी करता येईल असे वाटल्याने बडा राजनने अमीरजादाला न्यायालयात ठार मारण्याचा कट डेव्हिड परदेशी या नेमबाजामार्फत अंमलात आणला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *