Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

जायकवाडीतील आवक घटल्याने उजव्या कालव्याचा विसर्ग ४०० क्युसेकवर; सिंचनाचे नियोजन लक्षात घेऊन निर्णय

जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात पाटबंधारे विभागाने मोठी कपात केली आहे. काही दिवसांपूर्वी सुमारे १५०० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आलेला हा विसर्ग आता टप्प्याटप्प्याने कमी करून ४०० क्युसेकवर आणण्यात आला असून, सिंचनाचे नियोजन लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धरणात सध्या ८४.८० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणीपातळी १५१९.१० फूट असून, एकूण पाणीसाठा २५७९.०४९ दलघमी आहे; त्यापैकी जिवंत पाणीसाठा १८४०.९४३ दलघमी नोंदविण्यात आला आहे. सध्या धरणात केवळ ४६९ क्युसेक पाण्याची अत्यल्प आवक सुरू आहे. डाव्या कालव्यातून २२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, परिसरात आतापर्यंत २१४ मि.मी. पर्जन्यमान झाले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून ६६.४१ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे, तर विविध कालव्यांद्वारे ५.७९ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. गतवर्षी याच दिवशी धरणात ९९.२३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने धरणातील पाणीसाठा तुलनेने कमी असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *