Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

छ. संभाजीनगर : नॅशनल सहकारी सूतगिरणीचे काम आता अंतिम टप्प्यात

शेतकऱ्यांच्या कापसाला दरवाढ मिळून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सिल्लोड येथे उभारण्यात येत असलेल्या नॅशनल सहकारी सूतगिरणीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

येत्या काही दिवसांत या सूतगिरणीचा भव्य शुभारंभ होणार असून, त्याअनुषंगाने नॅशनल सहकारी सूतगिरणीला आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन यंत्रसामग्रीची पाहणी केली आणि सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी उपस्थित संचालक मंडळासोबत आढावा बैठक घेऊन सूतगिरणीच्या कामाची सद्यस्थिती, उर्वरित कामे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. नॅशनल सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून सिल्लोड तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बळ मिळण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *