Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम ‘व्हीजेटीआय’कडे! चौथा टप्प्याचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण, 6.09 कोटी खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर

महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘गोरेगाव-मुलुंड लिंक रोड’ (जीएमएलआर) प्रकल्पातील चौथ्या टप्प्यातील बांधकामाची दर्जेदार तपासणी करण्यासाठी वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेची (व्हीजेटीआय) त्रयस्थ गुणवत्ता आश्वासन यंत्रणा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1,354.52 कोटी रुपयांच्या या कंत्राट कामाचे तांत्रिक लेखापरीक्षण (टेक्निकल ऑडिट) करण्यासाठी व्हीजेटीआय संस्थेला 0.45 टक्के दराने 6 कोटी 9 लाख 53 हजार 827 रुपये सेवा शुल्क दिले जाणार आहे. पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर केला आहे.

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या जीएमएलआर प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यात मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग व ऐरोली टोल नाक्यादरम्यान महत्त्वाचे उड्डाणपूल व छेदनरस्ते (इंटरचेंज) बांधण्यात येत आहेत. या कामासाठी ‘मेसर्स अक्षया इन्फ्रा प्रोजेक्ट्स – हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी लि.’ (जे.व्ही.) यांना 20 मार्च 2026 रोजी कार्यादेश देण्यात आला असून 27 मार्च 2026 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *