Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

आदिवासी विभागाची यंत्रणा कुचकामी ठरल्याची मंत्र्यांची कबुली? उईकेंनी अभिजित दिपकेंना आव्हान दिले की मदत मागितली?

दिल्लीत जंतर मंतर येथे “जेन झी”आं दोलन गाजले. त्यानंतर महाराष्ट्रात आदिवासी युवकांनी आंदोलन सुरू केले आहे. आश्रमशाळा आणि आदिवासी शिक्षणाच्या प्रश्नांबाबत त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

राज्यातील आदिवासी विद्यार्थी आंदोलन जोर धरत आहे. या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री डॉ उईके सध्या नाशिक दौऱ्यावर आहे.

मंत्री उईके यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना गडचिरोली येथील जपतलाई आश्रम शाळेत जावे, असा सल्ला दिला आहे. त्या आश्रम शाळेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. दिपके यांनी या मृत्यूची कारणे शोधून शासनाला कळवावीत, असे आवाहन मंत्री उईके यांनी केले आहे.

राज्यात आतापर्यंत आदिवासी आश्रम शाळांमध्ये 584 विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी करण्यासाठी शासनाने समिती गठित केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित दोशी संस्थांवर कारवाई करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे दिपके यांनी राज्यातील विविध आश्रम शाळांना भेटी देण्याचा धडाका लावला आहे.

या आश्रम शाळेतील दुरावस्था आणि त्रुटी याबाबत सत्यता उघड करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दिपके यांच्या या मोहिमेनंतर मंत्र्यांनी त्यांना गडचिरोलीच्या आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्या मृत्यूची कारणे शोधण्याचे आवाहन केले आहे. आदिवासी विकास मंत्र्यांनी दिपके यांना आव्हान दिले की या प्रश्नावर त्यांची मदत मागितली हा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे.

आदिवासी आश्रम शाळांची स्थिती अत्यंत बिकट आहे. या संदर्भात मंत्र्यांनी आदिवासी विभागाची यंत्रणा कुचकामी ठरल्याची अप्रत्यक्ष कबुली तर दिली नाही ना? अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. आदिवासी आश्रम शाळांच्या प्रश्नावर युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी नाशिक सह विविध ठिकाणी आंदोलन केले आहे. नाशिक शहरात आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. कास क्राईम कर्मचारी संघटनाही या विषयावर आक्रमक आहेत. त्यामुळे मंत्री सध्या दबावाखाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *