Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

Cabinet Meeting Decisions : राज्य मंत्रिमंडळात 4 सर्व सर्वात मोठे निर्णय, शेतकऱ्यांनाही मोठी खुशखबर मिळाली!

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. वेगवेगळ्या विभागाचे महत्वाचे मंत्री या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी असलेल्या या बैठकीत एकूण चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

याच बैठकीत पुणे जिल्ह्यातील कुकडे पाटबंधारा प्रकल्पाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून शेकडो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. गृह विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभआगा या विभागाअंतर्गतही काही निर्णय घेण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

– नशामुक्त भारत अभियानात महाराष्ट्राचे पुढचे पाऊल. सन 2029 पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करणार. त्यासाठी राज्य शासनाचे सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन (A Whole-of Government Approach) धोरण जाहीर. (गृह विभाग)

– शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांच्या दरम्यान तसेच उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला मान्यता. संतुलित मेन्यू ठेवणे बंधकारक (सार्वजनिक आरोग्य विभाग)

– सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान उन्नत मार्ग प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास (NHAI) हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *