Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

नवरात्रीआधी ठाकरेंचे 14 आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ‘ऑपरेशन टायगर’ची 3 मंत्र्यांवर जबाबदारी, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय उलथापालथ?

आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप आणणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.कारण नवरात्रीपूर्वी ठाकरेंचे १४ आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, ठाकरेंच्या शिवसेनेच्या १४ आमदारांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांवर देण्यात आली आहे. यापैकी ६ आमदारांना सरकारमधली चांगली खाती आणि मंत्रीपदे पाहिजेत, अशीही माहिती समोर आली आहे.

तर यापैकी काही आमदारांची महामंडळ अध्यक्ष आणि राज्यमंत्रीपदी वर्णी लागणार असून, याबाबतची पक्षांतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती आहे. तर नवरात्रीपूर्वी या आमदारांचा पक्षप्रवेश झाल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेंकडून आणखी एक सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

त्यामुळे नुकतंच एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत ठाकरेंचे ६ खासदार फोडून त्यांना मोठा धक्का दिला होता. यानंतर आता लगेचच शिंदे ठाकरेंचे तब्बल १४ आमदार फोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवाय येत्या नवरात्रीपूर्वी हे ‘ऑपरेशन टायगर’ राबवलं जाणार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे नवरात्रीपूर्वी या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यास ठाकरेंना आणखी एक आणि सर्वात मोठा धक्का बसू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *