
श्रीलंकेत वृद्धाश्रमात लागलेल्या आगीत किमान ११ जणांचा मृत्यू झाला असून, सात वृद्ध व्यक्ती भाजल्याने जखमी झाल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोलंबोपासून आग्नेयेला सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर, कलुतारा जिल्ह्यातील अंगुरुवाटोटा येथील मावपिया सेवाना वृद्धाश्रमात आग लागली.
परिसरात १० मृतदेह आढळले, तर होराना बेस रुग्णालयात दाखल केल्यानंतर आणखी एका वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, एकूण ५१ जणांना वाचवण्यात आले असून, सात जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आगीचे दृश्य पाहून स्थानिक रहिवासी भयभीत झाले.
पोलिसांनी सांगितले की, स्थानिक रहिवासी आणि पोलिसांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. प्राथमिक अहवालानुसार, या घटनेदरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे आग वेगाने पसरली.



