Navgan News

ताज्या बातम्याराष्ट्रीय

Budget 2026: रुग्णांना दिलासा! मधुमेह आणि कॅन्सरची औषधं स्वस्त होणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा…


अर्थसंकल्प 2026 मध्ये मधुमेह व कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा.

औषधांच्या किमती स्वस्त करण्याची घोषणा.

३ केमिकल पार्क आणि सेमीकंडक्टरसाठी ४० हजार कोटींचा निधी.

आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा चालना देणारे निर्णय.

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे आज अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी मधुमेह आणि कॅन्सर या गंभीर आजारासंदर्भात मोठी घोषणा केली. मधुमेह आणि कॅन्सरची औषधं स्वस्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मधुमेह आणि कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.

मधुमेह आणि कॅन्सरची औषधं खूप महाग असतात. ही औषधं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाहीत. त्यामुळे या आजारासंदर्भात अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली. अर्थमंत्र्यांनी या आजाराच्या औषधाच्या किंमतीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेत रुग्णांना दिलासा मिळाला.

अर्थमंत्र्यांनी घोषणा करताना सांगितले की, ‘मधुमेह आणि कॅन्सरची औषधं स्वस्त करण्यात येणार आहेत. ३ मोठ्या केमिकल पार्कची स्थापना केली जाईल. सेमी कन्डक्टर क्षेत्रावर जास्त भर देण्यात येईल. सेमी कंटक्टरसाठी तब्बल ४० हजार कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली. आयात कमी करून निर्णय वाढवण्यावर भर दिला जाईल.’


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *