Video : पाकिस्तानी रात्री जात होते अन्… दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय क्षेपणास्त्र; घरात घुसून मारतानाचा व्हिडीओ व्हायरल…

भारतीय सेनाने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देत ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) लाँच केलं आहे. भारताने दहशतवाद्यांच्या नऊ तळावर स्ट्राइक केलं आहे.
७ ते २० सेकंदांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बहावलपूरपासून मुस्तफाबादपर्यंत दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करण्यात आले आहेत. इतर काही व्हिडिओंमध्ये लोक म्हणत आहेत, अरे! काय झालं…. व्हिडिओ बनवा…. व्हिडिओ
भारतीय सैन्याची ही कारवाई रात्री १.३० च्या सुमारास करण्यात आली. हे हल्ले बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे करण्यात आले आहेत.
भारतीय हवाई दलाकडून गस्त वाढवली
दरम्यान, सीमेवरून एक अपडेट आली आहे की, भारतीय हवाई दलाने हवाई गस्त वाढवली आहे. दिल्लीत बैठकांचा हा टप्पा सुरूच आहे. पीआयबीच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या लष्करी सुविधांना हात लावण्यात आला नाही, जेणेकरून कारवाईचा खरा उद्देश दहशतवादाचा नायनाट करणे आणि शेजारी देशासोबतचा संघर्ष वाढवू नये याची खात्री करता येईल. भारतातील कमी-अधिक ३०० ठिकाणी होणाऱ्या मॉक ड्रिलच्या काही तास आधी हवाई दलाने हा हल्ला केला.