स्पीड 12,144 KM प्रति तास, मारक क्षमता 1500 KM; भारताचे शक्तिशाली मिसाईल पाहून जगभरातील वैज्ञानिक…

भारतीय शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरीव सर्वात शक्तिशाली रॉकेट विकसीत केले आहे. 12,144 KM प्रति तास आणि 1500 KM ची मारक क्षमता असलेले हे रॉकेट पाहून जगभरातील वैज्ञानिक हडबडले आहेत.
याचा स्पीड पाहता हे रॉकेट दिल्लीतून अमेरिकेत फक्त एका तासात पोहचले. LRAShM असे या रॉकेटचे नाव आहे.
LRAShM म्हणजेच लाँग रेंज अँटी शिप मिसाईल (LRAShM) हे रॉकेट सर्वात शक्तिशाली अस्त्र आहे. हे एक हायपरसोनिक ग्लाइड शस्त्र आहे. डीआरडीओने LRAShM मिसाईल विकसित केले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 16 नोव्हेंबर 2024 रोजी ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कमाल बेटावरून याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
LRAShM मिसाईलची मारक क्षमता 1500 किमी इतकी आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय किनाऱ्यापासून 1500 किमी अंतरावर शत्रूचे जहाज किंवा युद्धनौका दिसल्यानंतर फक्त 7 ते 8 मिनिटांत त्याला टार्गेट करुन नष्ट करु शकते. LRAShM हे मिसाईल जमिनीवरून आणि हवेतूनही डागता येते.
संरक्षण तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार LRAShM चा कमाल वेग 6 ते 7 मॅक असेल. मॅक हे ध्वनीचा वेग मोजण्याचे एकक आहे. पण, प्रत्यक्षात हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा 10 पट वेगाने मारा करु शकते असा दावा केला जात आहे. एक मॅक वेग म्हणजे ताशी 1,235 किमी वेग. म्हणजे जेव्हा आपण काहीतरी बोलतो तेव्हा ते ताशी 1235 किमी वेगाने दुसऱ्यापर्यंत पोहोचते. पण, आपले हे क्षेपणास्त्र या वेगाच्या 10 पट वेगाने हल्ला करु शकते असा हा दावा आहे.
चीन आणि अमेरिका सारख्या देशाकडे देखील असे शक्तिशाली शस्त्र नाही. भारताने या LRAShM द्वारे स्क्रॅमजेट आणि ग्लाइड तंत्रज्ञानाचे एक अद्भुत उदाहरण सादर केले आहे. हे क्षेपणास्त्र एका सेकंदात 3.37 किमी अंतर कापते. चीनकडे असेच एक DF-17 नावाचे क्षेपणास्त्र आहे. त्याचा वेग 10ते 12 मॅक असल्याचेही सांगितले जाते. यावर्षीही त्यांनी असेच एक क्षेपणास्त्र बनवल्याचा दावा केला आहे. पण या दोन्ही क्षेपणास्त्रांची मारा क्षमता सुमारे 1000 किमी आहे. तर भारताच्या LRAshM ची मारा क्षमता 1500 किमी आहे.