Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि रणनीतिकार असण्यासोबतच एक उत्तम शिक्षक होते. मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर त्यांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांनी नीतिशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला, जो चाणक्य नीती या नावाने खूप प्रसिद्ध आहे. याच शास्त्रात चाणक्याने पुरुषांचे काही गुण सांगितले आहेत. महिलांना हे गुण असलेले पुरुष आवडतात. स्त्रिया या पुरुषांच्या प्रशंसक आहेत. हे गुण कोणते आहेत ते जाणून घेऊया.
प्रामाणिक पुरुष-
आचार्य चाणक्य यांच्या मते, स्त्रिया प्रामाणिक आणि मेहनती पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात. महिलांना प्रामाणिक पुरुष खूप आवडतात. प्रामाणिक पुरुषांच्या महिला प्रेमात पडतात. त्यांचा प्रामाणिकपणा त्यांना भुरळ पाडतो.
स्थिर आणि शांत पुरुष-
स्त्रियाना स्थिर आणि मुख्यतः शांत असणारे पुरुष आवडतात. कारण जो शांत असतो तो संबंध चांगल्या प्रकारे चालवतो. स्थिर पुरुष नातेसंबंधात कधीच धर पकड करत नाही तो नाते शेवटपर्यंत टिकवण्याची क्षमता ठेवतो.
एक चांगला श्रोता-
स्त्रिया चांगले श्रोते असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होतात. कारण स्त्रियांना त्यांच्या पतींनी चांगले ऐकावे आणि इतरांसमोर प्रभावीपणे बोलावे असे वाटते. त्यामुळेच अशा पुरुषांना महिला पसंत करतात.
प्रेमात विश्वासू माणूस-
प्रेमात निष्ठावान असलेल्या पुरुषांकडे स्त्रिया अधिक आकर्षित होतात. याशिवाय महिलांना चांगली वागणूक असणारे लोक आवडतात कारण स्त्रिया चांगल्या वर्तन आणि गुण असलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवतात.
अशा स्थितीत आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, महिलांना त्यांचे संपूर्ण आयुष्य हे गुण असलेल्या पुरुषांसोबत घालवायचे असते.