हिंदू धर्मात गरुडपुराणाला महत्त्वाचं स्थान आहे. हा एक पवित्र ग्रंथ असून ज्याला विष्णुपुराण असेही म्हणतात. हिंदू धर्मात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो, तेव्हा गरुड पुराणाचे पठण केले जाते.
असे मानले जाते की गरुड पुराणाचे पठण ऐकल्याने आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो. पण तुम्हाला माहित आहे का? की मृत्यूनंतर मृत आत्मा 13 दिवस घरात भटकत राहतो. जाणून घेऊया याचे कारण, ज्याचे वर्णन गरुड पुराणात केले आहे.
गरुड पुराणात मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते?
गरुड पुराणात मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते याचे तपशीलवार वर्णन आहे. गरुड पुराणात म्हटले आहे की, मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस त्याच्या कुटुंबातच राहतो. जेव्हा आत्मा कुटुंबाभोवती असतो तेव्हा त्याला काय वाटते? यमदूत तेरा दिवस यमलोकात का नेत नाहीत? या सर्व प्रश्नांनी उत्तरं आणि कारण जाणून घेऊया..
मृत्यूनंतर 13 दिवस आत्मा कुटुंबात का भटकत राहतो? गरुड पुराणात म्हटलंय..
गरुड पुराणात असे म्हटलंय की, जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा यमराजाचे दूत त्याचा आत्मा यमलोकात घेऊन जातात. जिथे त्याच्या पुण्य आणि पापांचा हिशोब होत असतो. मग चोवीस तासांत यमदूत मृत आत्म्याला घरी सोडतात. यमदूताने परत सोडल्यानंतर, मृताचा आत्मा त्याच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये फिरत असतो. मृत आत्मा आपल्या नातेवाईकांना हाक मारत असतो पण त्याचा आवाज कोणी ऐकत नाही. हे पाहून मृताचा आत्मा अस्वस्थ होतो आणि जोरजोरात ओरडू लागतो. तरीही मृत आत्म्याचा आवाज कोणी ऐकत नाही. जर मृत शरीरावर अंत्यसंस्कार केले नाही, तर आत्मा त्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. परंतु यमदूताच्या फासात बांधल्यामुळे आत्मा मृत शरीरात प्रवेश करू शकत नाही.
आत्मा काय विचार करतो?
गरुड पुराणानुसार, प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर घरातील लोक रडतात, तेव्हा हे पाहून मृत आत्मा दुःखी होतो. नातेवाइकांना रडताना पाहून मृत आत्माही रडू लागतो, पण काही करू शकत नाही. मग ती आपल्या हयातीत केलेली कृत्ये आठवून दुःखी होते. गरुड पुराणात असे म्हटले आहे की, जेव्हा यमदूत मृत आत्मा कुटुंबातील सदस्यांमध्ये सोडतो, तेव्हा त्या आत्म्याला यमलोकात जाण्यासाठी पुरेसे सामर्थ्य नसते.
पिंडदान- यमलोकात जाण्याचा मार्ग?
गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर दहा दिवस केले जाणारे पिंड दान मृत आत्म्याच्या विविध अवयवांची निर्मिती होते. मग अकराव्या आणि बाराव्या दिवशी केले जाणारे पिंड दान मृत आत्म्याच्या शरीराचे मांस आणि त्वचा तयार करण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर तेराव्या दिवशी मृत आत्म्याच्या नावाने अर्पण केलेले पिंडदान यमलोकात जाण्याचा मार्ग मोकळा करते. म्हणजेच मृत्यूनंतर तेरा दिवस मृत आत्म्याच्या नावाने जे पिंड दान अर्पण केले जाते, ते आत्म्याला मृत्यूच्या जगातून यमाच्या जगात जाण्याचे बळ देते.
आत्म्याला यमलोकात जाण्यासाठी एक वर्ष
त्यामुळे मृत आत्मा मृत्यूनंतरही तेरा दिवस आपल्या नातेवाइकांमध्ये भटकत राहतो. मृत आत्म्याला पृथ्वीवरून यमलोकात जाण्यासाठी एक वर्ष लागते. गरुड पुराणात म्हटले आहे की तेरा दिवस केले जाणारे पिंड दान मृत आत्म्याला अन्न म्हणून काम करते. त्यामुळे हिंदू धर्मात एखाद्याच्या मृत्यूनंतर दशक्रिया, बारावं, तेरावं केले जाते.