ताज्या बातम्या

कमला हॅरिस-डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ‘कांटे की टक्कर’; अमेरिकेचा नवा अध्यक्ष ठरणार उद्या, कोणाचं पारडं जड?


वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या (Democratic Party) उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत सुरू आहे.

नॉर्थ कॅरोलिना आणि जॉर्जियामध्ये हॅरिस यांना चांगला पाठिंबा मिळत आहे, तर दुसरीकडे ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनियामध्ये हॅरिस यांची आघाडी मोडून काढली असून अरिझोनामध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे. त्यामुळे ५ नोव्‍हेंबरला अमेरिकेचा अध्यक्ष कोण होणार, याची उत्कंठा वाढली आहे.

लढाईत डेमॉक्रॅटिकच्या कमला हॅरिस (Kamala Harris) आणि रिपब्लिकन पक्षाचे (Republican Party) डोनाल्ड ट्रम्प आमनेसामने आहेत. अत्यंत अटीतटीची लढत असून निवडणुकीच्या निकालासाठी काही तास शिल्लक असताना हॅरिस आणि ट्रम्प मतदारांना शेवटपर्यंत आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. पाठिंब्यासाठी देशवासीयांना आवाहन करताना दिसत आहेत. सात राज्यांमध्ये कोणत्याच उमेदवाराला निर्णायक आघाडी नसल्याचे दिसत आहे.

 

उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी विस्कॉनसिन येथील प्रचारसभेत आम्हीच जिंकणार, असा विश्‍वास व्‍यक्त करताना अमेरिकेत नव्‍या नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन केले. विस्कॉनसिन आणि उत्तर कॅरोलिनामध्ये शनिवारी हॅरिस यांनी जोरदार प्रचार केला. रविवारी आणि सोमवारी त्या मिशिगन, जॉर्जिया आणि पेनसिल्व्हेनियामध्ये असतील. ट्रम्प यांनी व्‍हर्जिनिया येथील प्रचाराचा शनिवारी समारोप केला. सालेममधील समर्थकांना संबोधित करताना त्यांनी देशात शांतता आणि समृद्धी आणण्याची ग्वाही दिली. या वेळी त्यांनी हॅरिस यांच्यावर उदारमतवादी डावे कट्टरपंथी असल्याचा हल्लाबोल केला.

हॅरिस यांची किंचित आघाडी

ट्रम्प पुढील दोन दिवस मिशिगन, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि उत्तर कॅरोलिनाच्या युद्धभूमीत असतील. त्यांना अरिझोना, नेवाडा, विस्कॉनसिन, मिशिगन, पेनसिल्व्‍हेनिया, उत्तर कॅरोलिना आणि जॉर्जिया या प्रमुख युद्धभूमीत जिंकण्यासाठी २७२ मतांची गरज आहे. 272towin.comनुसार हॅरिस यांना २२६ मतांची, तर ट्रम्प यांना २१९ मतांची खात्री आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी हॅरिस यांना ४४ मतांची, तर ट्रम्प यांना ५१ मतांची गरज आहे.

 

जाहिरातींचा महापूर!

गेल्या ५० तासांत दोन्ही उमेदवारांच्या जाहिरातींचा पूर आला आहे. टीव्‍ही आणि स्थानिक रेडिओ स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर जाहिराती सुरू आहेत. यावर कोट्यवधी डॉलर खर्च केले जात आहेत. ट्रम्प आणि हॅरिस यांनी प्रचारावर गेल्या काही तासांत मोठा खर्च केला आहे.

 

जगावर काय परिणाम होईल?

5 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकांनंतर कमला हॅरिस असोत की ट्रम्प विजयी होतात, अमेरिकेच्या धोरणांचा जगावर होणारा प्रभाव मर्यादितच राहणार आहे. अमेरिकेचे हित सर्वोपरि आहे आणि त्याचा जागतिक स्तरावर ठसा मजबूत करणे हे कोणत्याही प्रशासनाचे प्राधान्य असेल. ट्रम्प जिंकल्यास चीन किंवा इराण अमेरिकेचे शत्रू बनू शकतात, तर हॅरिस राष्ट्राध्यक्ष झाल्यास रशियाला आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. ही निवडणूक जागतिक शांततेत बदल घडवून आणणार नाही, ती केवळ संघर्षाच्या आघाड्या बदलू शकते.

भारतासाठी निवडणुकांचा अर्थ

आता, अमेरिकेच्या प्रत्येक निर्णयाचा भारतावर थेट परिणाम होत नाही, तर भारत-अमेरिका संबंधांतील स्थैर्य आणि धोरणात्मक भागीदारी या निवडणुकांच्या निकालामुळे अधिक दृढ होईल. कोणीही जिंकला तरी भारतासोबत व्यापार आणि लष्करी भागीदारी हा कायम विषय राहील, विशेषत: आशियातील चीनची वाढती ताकद लक्षात घेता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *