ताज्या बातम्या

सव्वा लाख भाविक, प्रवचन अन् अचानक चेंगराचेंगरी, शंभरहून अधिक मृत्यू, नेमक घडल काय?


उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras) जिल्ह्यातील फुलराई गावात भोले बाबा (Bhole Baba) सत्संगात चेंगराचेंगरी झाली. समोर आलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 122 पेक्षा जास्त भाविकांचा मुत्यू झाला आहे.

त्यामध्ये मोठ्या संख्यने महिलांचा समावेश आहे. तर शंभरहून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. आता अचानक झालेल्या चेंगराचेंगरीचे मुख्य कारणही समोर आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सिकंदरराव कोतवाली भागातील फुलराई गावात भोले बाबाचा प्रवचनाचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमाला तब्बल 1.25 लाख लोक उपस्थित होते असं सांगण्यात येत आहे. गर्दीमुळे लोकांचे हाल होऊ लागेल होते त्यामुळे अनेक जण बेहोश होऊ लागले होते तेव्हा ही चेंगराचेंगरी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

जेव्हा बेहोश होऊन लोक जमिनीवर पडले तेव्हा इतर लोक त्यांना चिरडून बाहेर येऊ लागले. तर या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शेकडो गंभीर लोकांना रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी प्रशासनाला दिले आहेत. मृतांप्रती योगी आदित्यनाथ यांनी दुख: व्यक्त केले आहे.जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

सरकारी दवाखान्यात स्ट्रेचर कमी

माहितीनुसार, या दुर्घटनेत मोठ्या संख्याने भाविक जखमी झाले आहे की सरकारी रुग्णालयात स्ट्रेचरची कमतरता पडत आहे. त्यामुळे हातरस प्रशासनाने खासगी रुग्णालयांनाही अलर्ट राहण्याची सूचना दिली आहे. जखमींना बेडची उपलब्ध करून देण्यात यावी अशी सूचना देखील देण्यात आली आहे. तसेच जखमींना खासगी रुग्णालयात नेण्यात येत आहे. अशी देखील माहिती समोर आली आहे.

कोण आहे भोले बाबा

हातरस येथे सत्संगासाठी आलेले भोले बाबा हे कासगंज जिल्ह्यातील पटियालीच्या बहादूर नगरचे रहिवासी आहेत. माहितीनुसार, त्यांचे नारायण साकार हरी असे नाव आहे. त्यांनी 17 वर्षांपूर्वी पोलिसात एसआयची नोकरी सोडली होती आणि तेव्हापासून त्यांनी सत्संगाला सुरुवात केली असं सांगण्यात येत आहे.

 

त्यांनी त्यांच्या नोकरीच्या काळात मानवतेची सेवा सुरू केली अशी देखील माहिती समोर आली आहे. तर भोले बाबा आणि त्यांचे अनुयायी माध्यमांपासून दूर राहतात असं देखील सांगण्यात येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *