महाराष्ट्रराजकीय

Pankaja Munde : माझे हे यश माझ्या त्या कार्यकर्त्यांना समर्पित ; विधान परिषदेचा अर्ज भरल्यानंतर पंकजा मुडेंनी दिली ही प्रतिक्रिया


 

Pankaja Munde : मुंबई – सोमवारी भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर मंगळवारी त्यांनी आपला अर्ज भरला आहे. यानंतर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “लोकसभा निवडणुकीमध्ये मला अगदी कमी मतांनी पराभव पत्करावा लागला होता.

पण आता मला पुन्हा एकदा पक्षाने संधी दिल्याने आनंद वाटतो आहे. हा आनंद माझ्या लोकांसाठी वाटतो आहे, कारण आज त्यांच्या घरी दिवाळी साजरी करत आहेत.” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. (Pankaja Munde reaction after filed nomination for maharashtra legislative council elections)

“पराभवानंतर ज्या समर्थकांनी आत्महत्या केल्या, त्यांनी असे करायला नको होते. ते जर थोडे थांबले असते तर ते या जल्लोषात असते. त्यांचं जाणं माझ्या जिव्हारी लागले.” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी अर्ज भरल्यानंतर दिली. त्या पुढे म्हणाल्या की, “पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकण्याचे ठरवले आहे. पक्षाने मला संधी दिल्यानंतर मला पक्षासाठी काय योगदान देता येईल? यासाठी मी काम करणार आहे. मला संधी दिल्याबद्दल मी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानते.” असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह सर्व भाजपच्या प्रमुख नेत्यांचे आभार मानले.

 

माझे हे यश माझ्या त्या कार्यकर्त्यांना समर्पित : पंकजा मुंडे

 

“लोकसभा पराभवानंतर काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या. त्यांची आत्महत्या माझ्या जिव्हारी लागलेली आहे. माझे हे जे यश आहे, ते मी या कार्यकर्त्यांना समर्पित करते. माझ्यावर निष्पाप प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी हे सर्व यश समर्पित करते. त्यांनी असे करायला नको होते. आपल्याला अजून खूप काम करायचे आहे. जनतेने मला खूप प्रेम दिले आहे. पण कोणीही नेत्यासाठी आपला जीव देऊ नये,” अशा भावना पंकजा मुंडे यांनी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *