ताज्या बातम्या

VIDEO : सावधान ! घरात वॉशिंग मशीनचा वापर करत असाल तर ,कपडे धुताना व्यक्तीचा ३ सेंकदात अंत, नेमकं काय घडलं?


अलीकडच्या काळात अनेकांच्या घरी कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. विशेषतः नोकरदार महिलांसाठी वॉशिंग मशीन एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.

महिलांना कपडे धुण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही, त्यामुळे महिलांकडून वॉशिंग मशीनच्या वापरावर भर दिला जातो. मात्र, काम सोपे करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या वॉशिंग मशीनमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कपडे धूत असताना विजेचा धक्का लागून या व्यक्तीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही वॉशिंग मशीनचं बटण सुरू असताना त्यामध्ये हात घालताना शंभर वेळा विचार कराल.

कपडे धुताना व्यक्तीने गमावले प्राण, नेमकं काय घडलं?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी आला आहे. त्यानं सगळे कपडे मशीनमध्ये टाकले आहेत, पाणीही टाकले आहे. यावेळी त्यानं पॉवरचं बटणही सुरू केलंय. फक्त मशीनचं झाकण बंद करायचं बाकी आहे. यावेळी ती व्यक्ती मशीनचं झाकण बंद करण्याआधी मशीनमध्ये हात घालते आणि क्षणात त्याला जबरदस्त असा शॉक लागतो. ती व्यक्ती पूर्णपणे मशीनला चिकटून राहते. बराच वेळ मशीनला चिकटून राहिल्यानंतर ती व्यक्ती खाली पडते. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा.

शरीरातून वीज वाहताना शरीरावर जो परिणाम होतो, त्याला विजेचा धक्का किंवा शॉक म्हणतात. अशा वेळी शरीरात कंपने येतात. शरीरात उष्णता निर्माण होते. शरीरातील मज्जातंतूवर या विजेचा परिणाम होतो. विजेचा धक्का बसलेली व्यक्ती खूप घाबरते आणि किंचाळते. विजेचा संपर्क झालेल्या उपकरणापासून दूर होण्याचा प्रयत्न करते. यात यश आले, तर धोका काहीसा टळतो; पण वीजगळती असलेल्या उपकरणापासून दूर होता आले नाही तर ती व्यक्ती उपकरणाला तशीच चिकटलेल्या अवस्थेत राहते, असंच या व्यक्तीसोबत घडलं.

व्हिडिओ पहा👇👇👇👇

https://www.instagram.com/reel/C79snr6Cqoz/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, वॉशिंग मशीन जमिनीवर ठेवून कपडे धुणे घातक ठरू शकते. त्यामुळे वॉशिंग मशीनच्या खाली लाकडी स्टँड ठेवावा. त्यामुळे मशीनच्या आजूबाजूला पाणी असले तरी विद्युत प्रवाह वॉशिंग मशीनला स्पर्श करणार नाही. तसेच वॉशिंग मशीनमध्ये हात घालण्यापूर्वी ते पूर्णपणे बंद करा. शक्य असल्यास, त्याची वायर स्वीच बोर्डमधून काढून टाका. या तीन महत्त्वाच्या खबरदारी घेतल्यास अशा प्रकारच्या दुर्घटना व अपघात टाळता येतील.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *